बारावीचा निकाल मे अखेर

By admin | Published: May 23, 2017 03:49 AM2017-05-23T03:49:07+5:302017-05-23T03:49:07+5:30

मे महिन्याच्या सुरुवातीपासून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दहावी, बारावीच्या निकालांच्या तारखांमुळे पालक आणि विद्यार्थी संभ्रमात होते

The result of HSC result | बारावीचा निकाल मे अखेर

बारावीचा निकाल मे अखेर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीपासून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दहावी, बारावीच्या निकालांच्या तारखांमुळे पालक आणि विद्यार्थी संभ्रमात होते. पण आता लवकरच बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. बोर्डाकडून बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून निकालाची तयारी सुरू आहे. निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असून मे अखेरपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र अद्याप बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केली नसल्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही बोर्डातर्फे करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा घेतली. राज्यातील ९ विभागीय मंडाळांतून ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थी बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. निकालाची कागदोपत्री तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. बारावीच्या परीक्षेचा निकाल मे अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, निकालाची वेळ आणि तारीख अजूनही बोर्डाने जाहीर केलेली नाही. लवकरच तारीख जाहीर करण्यात येईल, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले.

Web Title: The result of HSC result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.