तेजसबाबत प्रवाशांनी लावला तक्रारींचा सूर

By admin | Published: May 24, 2017 05:10 PM2017-05-24T17:10:17+5:302017-05-24T17:10:17+5:30

मोठा गाजावाजा करत कोकण रेल्वेनं चाकरमान्यांच्या सेवेत तेजस एक्स्प्रेस नावाची नवी ट्रेन दाखल केली.

Passengers complained about Tejas | तेजसबाबत प्रवाशांनी लावला तक्रारींचा सूर

तेजसबाबत प्रवाशांनी लावला तक्रारींचा सूर

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मोठा गाजावाजा करत कोकण रेल्वेनं चाकरमान्यांच्या सेवेत तेजस एक्स्प्रेस नावाची नवी ट्रेन दाखल केली. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्याचाही रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. मात्र तेजस एक्स्प्रेसनं प्रवाशांची निराशा केली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटलेली तेजस एक्स्प्रेस सुस्थितीत करमाळीत पोहोचली. मात्र करमाळीहून परततानाही तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना घाणीचं साम्राज्य पाहायला मिळालं. ट्रेनमध्ये जागोजागी अस्वच्छता, दुर्गंधी आणि अपुऱ्या सोयींमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

मंगळवारी तेजस एक्स्प्रेस करमाळी स्थानकावरून सुटली, त्यावेळी ट्रेनमध्ये अस्वच्छता पाहायला मिळाली. तसंच तेजस एक्स्प्रेसमधील शौचालय स्वच्छ न ठेवल्यामुळे अनेक डब्यात दुर्गंधी पसरली होती. तेजस एक्स्प्रेसमधील एका कुटुंबाला स्वयंचलित दरवाज्यांमुळे त्रास झाला आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचा मज्जा लुटणा-या प्रवाशांच्या हालाला पारावार उरला नव्हता. एक मुलगा रत्नागिरी स्टेशनला उतरला, मात्र त्याच वेळी अचानक ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले. त्यामुळे त्याला ट्रेनमध्ये प्रवेश करता आला नाही. नाइलाजास्तव त्या तरुणाला रत्नागिरी स्थानकावर दुस-या ट्रेनची वाट पाहावी लागली. तर त्याचे कुटुंबीय मुंबईला पुढे निघून गेले. त्यामुळे कोणतेही स्टेशन आल्याची आणि दरवाजे बंद कधी होणार असल्याची उद्घोषणा करावी, अशी मागणी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. 
 
तत्पूर्वी ताशी तब्बल 200 किलोमीटर वेगाने धावणारी देशातील सर्वात वेगवान ट्रेन असे बिरुद मिरवणारी ‘तेजस’ एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्गावर अखेर सोमवारी धावली. दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी सुटलेली तेजस एक्स्प्रेस रात्री 12.35 वाजता करमाळी(गोवा) स्थानकात पोहोचण्याची वेळ असतानाच उशिरा दाखल झाली.  तेजस एक्स्प्रेसला छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कुडाळ आणि करमाळी अशा स्थानकांवरच थांबा देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे रविवारी शर्मा आणि अन्य अधिकाऱ्यांनी ‘तेजस’ एक्स्प्रेसचे (मुंबई-करमळी) निरीक्षण केले होते. त्या वेळी ते म्हणाले होते की, ‘गेली तीन वर्षे ‘तेजस’ एक्स्प्रेससाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.’ प्रवाशांच्या गरजांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या या गाडीतून प्रवास करण्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

Web Title: Passengers complained about Tejas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.