दुस-या दिवशीही राज्यभरात शेतमालाची नासाडी ( फोटो स्टोरी)
By admin | Published: June 2, 2017 11:06 AM2017-06-02T11:06:01+5:302017-06-02T11:06:01+5:30
शेतकरी संपाच्या दुस-या दिवशीही राज्याच्या विविध भागात शेतीमालाची नासाडी सुरु आहे. आक्रमक झालेले आंदोलक कुठे रस्त्यावर दूध ओतून देत आहेत
Next
ऑनलाइन लोकमत
शेतकरी संपाच्या दुस-या दिवशीही राज्याच्या विविध भागात शेतीमालाची नासाडी सुरु आहे. आक्रमक झालेले आंदोलक कुठे रस्त्यावर दूध ओतून देत आहेत तर, कुठे भाजीपाला रस्त्यावर फेकला जात आहे. काल पहिल्या दिवशी मुंबईसह अन्य शहरांना या संपाची विशेष झळ जाणवली नव्हती. पण आज मात्र दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. मुंबई, ठाण्याला फळभाज्यांचा पुरवठा करणा-या नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये गाडयांची आवक घटली आहे. दररोज 500 ट्रक भरुन फळभाज्या एपीएमसी मार्केटमध्ये येतात पण आज फक्त 180 गाडया आल्या. यात 49 ट्रक आणि 131 टेम्पो आहेत. ठाणे आणि कल्याणमध्ये भाजीपाल्याची एकही गाडी आलेली नाही.
जाणून घ्या कुठे काय चालू आहे
नवीमुंबई एपीएमसी भाजी मार्केटमध्ये गुजरात, कलकत्ता, दिल्ली, मध्यप्रदेश येथून भाज्या आल्या.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकी मार्केटयार्डमधे भाजीपाल्याची फक्त १० टक्के आवक