१९३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के !

By admin | Published: June 14, 2017 04:25 AM2017-06-14T04:25:26+5:302017-06-14T04:25:26+5:30

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या शालान्त परीक्षेच्या (इयत्ता १०वी) निकालात तब्बल १९३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के म्हणजे सर्व विषयांत

1 9 3 students hundred percent! | १९३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के !

१९३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के !

Next

पुणे : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या शालान्त परीक्षेच्या (इयत्ता १०वी) निकालात तब्बल १९३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के म्हणजे सर्व विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळवून नवा इतिहास घडविला. शालान्त आणि उच्च माध्यमिक परीक्षांच्या निकालांची आणि सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी गेली काही वर्षे उत्तरोत्तर वाढत आहे. मंडळाने गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे बंद केल्याने नावे उघड झाली नसली तरी पैकीच्या पैकी गुण मिळविणारे हे सर्व विद्यार्थी या परीक्षेत सर्वप्रथम आले आहेत, हे उघड गुपित आहे.
दहावीचा निकाल ८८.७४ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा निकाल ०.८२ टक्के कमी आहे. बारावीपाठोपाठ या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून, ९१.४६ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५ टक्क्यांनी जास्त आहे. विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका व कलचाचणीच्या अहवालाची प्रत २४ जून रोजी दिली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल सर्वोत्तम पाच (बेस्ट आॅफ फाइव्ह) पद्धतीने मंगळवारी जाहीर केला. राज्यातील नऊ विभागीय मंडळांत कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.१८ टक्के, तर सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा ८३.६७ टक्के लागला आहे. राज्यातील एकूण २१ हजार ६८४ शाळांमध्ये ३ हजार ६७६ शाळांचा निकाल १०० टक्के, तर ३२ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्गत १६ लाख ४४ हजार १६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी १४ लाख ५८ हजार ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
राज्यातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ४७० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. त्यापैकी १९३ विद्यार्थ्यांना क्रीडा व कलागुणांचे अधिकचे गुण मिळाल्याने त्यांचे गुण १०० टक्के इतके झाले आहेत. राज्यातील १५३ विद्यार्थी ३५ टक्के घेऊन उत्तीर्ण झाले.
राज्यातील ३ लाख ४९ हजार विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, तर ५ लाख ४४ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ११ हजार आहे. परीक्षेतील गैरप्रकारांसह विविध कारणांमुळे १ हजार ६७६ विद्यार्थ्यांचे निकाल मंडळाने राखून ठेवले आहेत.


विभाग निहाय शून्य व शंभर टक्के निकालाच्या शाळांची संख्या
विभाग शून्य टक्के शंभर टक्के
पुणे ३७३७
नागपूर१ २६९
औरंगाबाद ६२९१
मुंबई८७९६
कोल्हापूर १६५१
अमरावती४२४२
नाशिक०३१७
लातूर९१३३
कोकण ०२४०
एकूण३२३,६७६

निकालाची प्रमुख वैशिट्ये...
- सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वाधिक ९७.९५ टक्के निकाल,
- यवतमाळ जिल्ह्याचा सर्वात कमी ७८.०३ टक्के निकाल
- कलागुणांचा ८१ हजार ७३६ विद्यार्थ्यांना लाभ
- क्रीडा गुणांचा ३ हजार ९०३ विद्यार्थ्यांना लाभ

राज्यातील अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ८५.७२ टक्के लागला आहे. मंडळातर्फे ५६ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यात १० विषयांचा निकाल १०० टक्के आहे.

Web Title: 1 9 3 students hundred percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.