1993 मुंबई बॉम्बस्फोट : आरोपी कादिर अहमदला उत्तर प्रदेशातून अटक

By Admin | Published: July 8, 2017 02:06 PM2017-07-08T14:06:30+5:302017-07-08T15:10:33+5:30

गुजरात आणि उत्तर प्रदेश एटीएसनं संयुक्त कारवाई करत बिजनौर येथून कादिर अहमद नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे

1993 Mumbai bomb blast: accused Qadir Ahmed arrested from Uttar Pradesh | 1993 मुंबई बॉम्बस्फोट : आरोपी कादिर अहमदला उत्तर प्रदेशातून अटक

1993 मुंबई बॉम्बस्फोट : आरोपी कादिर अहमदला उत्तर प्रदेशातून अटक

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 8 - गुजरात आणि उत्तर प्रदेश एटीएसनं संयुक्त कारवाई करत बिजनौर येथून कादिर अहमद नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमद हा 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटाती दोषी आहे.
 
बिजनौरमधील नजीबाबाद येथून टाडानं दोषी ठरवलेल्या कादिर अहमदला अटक करण्यात आली आहे. मुंबई स्फोटात शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात अहमदचा सहभाग होता, असा आरोप आहे.
 
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, साखळी स्फोटासाठी टायगर मेमनद्वारे जामनगर येथे जी शस्त्रास्त्र आणि स्फोटकं पुरवण्यात आली होती, त्यात कादिरचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.
 
आता गुजरात पोलिसांनी कादिरला आपल्या ताब्यात घेतले आहे.  गुजरात पोलिसांनी कादिरची ट्रान्झिट रिमांड घेण्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसनं त्याची चौकशी केली.  
 
मुख्य सूत्रधारासहीत 33 आरोपी फरार
दरम्यान, मुंबई स्फोटात मुख्य सूत्रधार कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, त्याचा भाऊ अनीस इब्राहिम, छोटा शकील, मुस्तफा डोसाचा भाऊ मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन यांचा समावेश होता.  मात्र या स्फोटाच्या कटात सहभागी असलेले एकूण 33 जण फरार असल्याचे बोलले जात आहे. 
आणखी बातम्या वाचा
मुस्तफा डोसाचा मृत्यू
 

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवलेल्या मुस्तफा डोसा याचा 28 जूनला जे.जे. रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला उच्च रक्तदाब व मधुमेहाचा होता.

विशेष टाडा न्यायालयाने १६ जून रोजी त्याला १९९३ साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवले होते. न्यायालयाने दोषी ठरवल्याबद्दल डोसाला धक्का बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता. या निर्णयानंतर त्याची तब्येत खालावत गेली. त्यामुळे न्यायालयाने त्याला रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. मात्र डोसाने स्पष्ट नकार दिला. ‘मरायचंच आहे तर रुग्णालयात दाखल का होऊ?’ असे त्याने न्यायालयाला सांगितले.

डोसाची तब्येत बिघडल्याने मंगळवारी मध्यरात्री १च्या सुमारास त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तीन तासांच्या उपचारानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात पाठवले. पण काही काळाने त्याला ताप आला व छातीतही दुखू लागले. सकाळी पुन्हा त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. या वेळी उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी २.३०च्या सुमारास डोसाचा मृत्यू झाला, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

१९९३ बॉम्बस्फोटांतील डोसाची भूमिका-

मुंबईमध्ये १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत २५७ जणांचा मृत्यू झाला तर ७००हून अधिक लोक गंभीररीत्या जखमी झाले. सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याने १९९५ साली दिलेल्या जबाबावरून मुस्तफा डोसाला या स्फोटाचा आरोपी करण्यात आले.

त्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २० मार्च २००३ रोजी अटक करण्यात आली. मात्र डोसाने आपण निर्दोष असून ते सिद्ध करण्यासाठी स्वत:हून पोलिसांना शरण आल्याचा दावा न्यायालयापुढे केला होता.

Web Title: 1993 Mumbai bomb blast: accused Qadir Ahmed arrested from Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.