मुंबई लोकलमध्ये तरुणीसमोर विकृताचे अश्लील चाळे, रेल्वे प्रशासनानं केलं दुर्लक्ष

By admin | Published: July 10, 2017 12:52 PM2017-07-10T12:52:14+5:302017-07-10T14:52:29+5:30

महिलांवर होणा-या अत्याचाराच्या घटना प्रत्येक दिवशी समोर येत असतात. जेव्हा एखाद्या महिलेवर बलात्कार होतो तेव्हा केवळ प्रशासनाचे नाही तर राजकारण्यांचेही खडबडून जागं होतं.

In the Mumbai local, the obscene behavior of the villagers in front of the girl, the railway administration ignored | मुंबई लोकलमध्ये तरुणीसमोर विकृताचे अश्लील चाळे, रेल्वे प्रशासनानं केलं दुर्लक्ष

मुंबई लोकलमध्ये तरुणीसमोर विकृताचे अश्लील चाळे, रेल्वे प्रशासनानं केलं दुर्लक्ष

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - महिलांवर होणा-या अत्याचाराच्या घटना प्रत्येक दिवशी समोर येत असतात. जेव्हा एखाद्या महिलेवर बलात्कार होतो तेव्हा केवळ प्रशासनच नाही तर राजकारणीही खडबडून जागे होतात. अचानक त्यांचे डोळे उघडतात. मग आरोपींच्या अटकेसाठी, त्यांना शासन व्हावं यासाठी निदर्शनं केली जातात. सर्वच घटनांमध्येही असे नाही पण काही वेळा छेडछाड किंवा विनयभंग यांसारख्या घटनांकडे दुर्लक्ष केलं जातं. 
 
असाच काहीसा प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. मुंबईमध्ये राहणा-या 22 वर्षीय पूजा नायरला लोकलमधून प्रवास करताना भयावह प्रकाराला सामोरं जावे लागले.  चर्चगेट ते बोरिवली लोकलनं प्रवास करत असताना महिला डब्या लागून असलेल्या अपंगाच्या डब्यात एक विकृत तरुण उभा होता. हा विकृत महिलांना पाहून अश्लिल इशारे करत होतो, अर्वाच्य भाषा वापरत होता. तो इथंवरच थांबला नाही तर  थोड्या वेळानं या विकृतानं आपली पॅन्टची चेन उघडून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. 
 
यावेळी पूजा व अन्य महिलांनी महिला हेल्पलाइनवर संपर्क साधून घडल्या प्रकाराबाबत तक्रार केली. लोकलमध्ये घडलेला प्रकार हेल्पलाइनवर सांगण्यात आला तर यावर महिलांना मदत करण्याऐवजी अधिका-यानं गोष्ट हसण्यावारी नेऊन फोट चक्क कट केला.  दरम्यान, अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्याची ही पहिलीच वेळ नाही. या घटनेकडे रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.  
  
आणखी बातम्या वाचा 
(दलित मुलींना मंदिरप्रवेश न देणा-या पुजा-यासहीत 3 जणांविरोधात गुन्हा)
 

Web Title: In the Mumbai local, the obscene behavior of the villagers in front of the girl, the railway administration ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.