सीएसटी स्थानकात अश्लिल चाळे करणाऱ्या अशोक प्रधानला अटक
By admin | Published: July 12, 2017 09:30 PM2017-07-12T21:30:35+5:302017-07-12T22:00:55+5:30
मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकात ‘तपोवन एक्स्प्रेस’मध्ये तरूणीला पाहून अश्लिल चाळे करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकात ‘तपोवन एक्स्प्रेस’मध्ये तरूणीला पाहून अश्लिल चाळे करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
अशोक प्रधान (20 वर्ष) असे या तरुणाचे नाव असून तो मुळचा भुवनेश्वरचा आहे. 29 जून रोजी सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास सीएसटी स्थानकावर हा प्रकार घडला. 22 वर्षाची तरुणी कामानिमित्त नाशिकला निघाली होती. यावेळी सीएसटी स्थानकात आल्यावर ती प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर उभ्या असलेल्या ‘तपोवन एक्स्प्रेस’ने नाशिकला जाण्यासाठी निघाली. त्यानंतर स्थानकावर अंधार आणि प्लॅटफॉर्मवर कोणी नाही हे बघून ट्रेनमध्ये थांबलेल्या अशोक प्रधान या विकृत तरुणाने तिच्याकडे पाहून हस्तमैथून करत असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे घाबरल्याने ती तरुणी दुसरीकडे जाऊन उभी राहिली. पण तिथेही तो तिच्यासमोर असणाऱ्या बोगीत जाऊन उभा राहिला आणि अश्लिल चाळे करू लागला. यावेळी तिने पुरावा म्हणून त्या विकृताचा व्हिडिओही काढला. त्यानंतर याची माहिती तिने पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी त्यावेळी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
दरम्यान, या झालेल्या प्रकाराबद्दल मीडियाने बातमी दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी अशोक प्रधान याला तब्बल दहा दिवसांनंतर अटक केली आहे. अशोक प्रधान हा मुळचा अशोक प्रधान हा भुवनेश्वरचा असून सध्या तो मुंबईत बिगारी काम करतो. त्याच्यावर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.