VIDEO- मलिष्काने मानले माध्यमांचे आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 09:48 AM2017-07-20T09:48:40+5:302017-07-20T09:48:40+5:30
न्यूयॉर्क दौऱ्यावर असलेल्या मलिष्काने सगळ्या माध्यमांचे आभार मानले आहेत
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20- ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय’ असा व्हिडीओ आरे मलिष्का आणि सहकाऱ्यांनी तयार केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या कारभारावर मलिष्काने ताशेरे ओढल होते. मलिष्काने तयार केलेल्या या गाण्यावर सेनेने कडाकडून टीका केली इतकंच नाही, तर महापालिकेने आरजे मलिष्कावर कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे सगळी माध्यमं मलिष्काच्या बाजूने उभी राहिली आहेत. सध्या आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी न्यूयॉर्क दौऱ्यावर असलेल्या मलिष्काने सगळ्या माध्यमांचे आभार मानले आहेत. तिने ट्विटरवर व्हिडीओ शेअर करून माध्यमांचे आभार मानले आहेत. याआधी आरजे मलिष्काने बुधवारी ट्विट करुन, मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही खूप चांगले आहात. मुंबई, तू बेस्ट आहेस. मला तुझ्यावर भरोसा आहे, असं म्हटलं होतं.
I"m thanking u from NYc https://t.co/DITeTCQqtd
— Mumbai Ki Rani (@mymalishka) July 19, 2017
मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या
रेडिओ जॉकी मलिष्काचे मुंबईच्या खड्ड्यांवरील गाणे शिवसेनेला चांगलंच झोंबलं आहे. त्यामुळे तिच्यावर पाचशे कोटींचा दावा ठोकण्याची मागणी शिवसेनेने केल्यानंतर बुधवारी लगेच तिच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचा साक्षात्कार पालिकेला झाला. या प्रकरणी पालिकेने मलिष्काला नोटीसही बजावली आहे. तसेच तिचे एखादे बेकायदा बांधकामही असल्याची कुजबुज सुरू झाली आहे. त्यामुळे मलिष्का ही पालिका आणि शिवसेनेच्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट झालं. रेडिओ जॉकी मलिष्काचे ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?’ हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे सत्तेवरील शिवसेनेचे धाबे दणाणले. मलिष्काला खोटे पाडण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले. या गाण्यामुळे महापालिकेची बदनामी झाल्याने मलिष्का आणि त्या रेडिओ चॅनेलवर कारवाईची मागणी शिवसेनेने आयुक्त अजय मेहता यांच्याकडे केली आहे. मलिष्का वांद्रे पश्चिमेकडील सनराईज इमारतीत राहते. एच वेस्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी या इमारतीत तपासणी केली. तेव्हा तिची आई लिली मेंडोंसा यांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. सूडबुद्धीने एका दिवसात मलिष्काचे घर शोधून तिच्या घरात ‘डेंग्यू’प्रकरणी तिच्यावर कारवाई केल्याचा आरोप भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने केला.
आणखी वाचा
नोटाबंदीचा फटका; 4 महिन्यात गेल्या 15 लाख लोकांच्या नोकऱ्या
अवघ्या १२ दिवसांत तब्बल ८ लाख पेपर तपासण्याचे आव्हान
मुंबईत विजेवरही धावणार टॅक्सी-रिक्षा
सेनेने ओढवून घेतला नसता वाद
मलिष्काच्या घरात अळ्या सापडल्या ‘गोलगोल’, मलिष्काने शिवसेनेची केली ‘पोलखोल’, अशा शब्दांत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली. या अळ्या महापालिकेला अगोदर का नाही सापडल्या, असा सवाल करत हा शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा व्यंगचित्रातून विडंबन केले. परंतु त्यावर कधी असे राजकारण झाले नाही. शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या शिकवणीचा विसर पडला आहे. मुद्दाम एखाद्याला असा त्रास देणे सेनेला शोभत नाही, असा टोला मनसेने लगावला.
काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मलिष्काप्रकरणी ट्विटरच्या माध्यमातून सेनेची खिल्ली उडवली. ‘मलिष्का तू एकटी नाही. आम्ही आहोत तुझ्या बरोबर.. वाघोबा करतो म्याव म्याव.. आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!’, असे ट्विट करत राणे यांनी मलिष्काला आपला पाठिंबा जाहीर केला