विद्यापीठाने घडविले १२ अब्जाधीश

By admin | Published: September 23, 2014 05:15 AM2014-09-23T05:15:04+5:302014-09-23T05:15:04+5:30

जगातील प्रतिष्ठित विद्यापीठांच्या यादीत देशभरातील एकाही विद्यापीठाला स्थान मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते.

The University Builds 12 Billionaire | विद्यापीठाने घडविले १२ अब्जाधीश

विद्यापीठाने घडविले १२ अब्जाधीश

Next

मुंबई : जगातील प्रतिष्ठित विद्यापीठांच्या यादीत देशभरातील एकाही विद्यापीठाला स्थान मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. परंतु अब्जाधीश मिळवून देण्यात मुंबई विद्यापीठाने देशात अव्वल क्रमांक पटकवला आहे. हे विद्यापीठ नवव्या स्थानी आहे. मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या १२ अब्जाधीशांनी यशाचे शिखर गाठल्याचे ‘वेल्थ-एक्स, स्विस बँके’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
मुंबई विद्यापीठाला गौरवशाली इतिहास आहे. विद्यापीठातून दर्जेदार शिक्षण घेतलेल्यांपैकी अनेकांनी विविध क्षेत्रांत आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या व्यक्ती विविध क्षेत्रांत नेतृत्व करीत आहेत. जगभरातील प्रतिष्ठित विद्यापीठांच्या यादीत भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश होत नाही, याबद्दल शिक्षण क्षेत्रात खंत व्यक्त करण्यात येते. परंतु दर्जेदार शिक्षणाची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या व्यक्तींमधून १२ अब्जाधीश निर्माण झाले आहेत.
वेल्थ-एक्स, स्विस बँकेने जगभरातील विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेल्या अब्जाधीशांचे नुकतेच सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून मुंबई विद्यापीठातून १२ अब्जाधीशांनी शिक्षण घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सर्वेक्षणात मुंबई विद्यापीठ जगात नवव्या स्थानावर आहे. तर आघाडीच्या विद्यापीठांमध्ये युनिव्हर्सिटी आॅफ पेन्सिव्हॅनियातून २५ अब्जाधीश घडले आहेत. हार्वर्ड विद्यापीठ २२, याले विद्यापीठ २0, यूएससी १६, प्रिन्सेटॉन विद्यापीठ १४, कॉर्नेल विद्यापीठ १४, स्टॅनफोर्ड विद्यापीठ १४, यूसी बेरकले विद्यापीठ १२ आणि मुंबई विद्यापीठ १२ व्या स्थानावर आहे. मुंबई विद्यापीठातून दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. यामधून १२ अब्जाधीश घडले आहेत. विद्यापीठाच्या या कामगिरीने आयआयटीलाही मागे टाकले आहे.

Web Title: The University Builds 12 Billionaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.