‘संविधान दिना’ची अंमलबजावणीच नाही

By admin | Published: November 26, 2014 11:54 PM2014-11-26T23:54:53+5:302014-11-26T23:54:53+5:30

भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो; परंतु राज्यातील अनेक कार्यालयांत हा दिन साजरा केला जात नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.

The Constitution Day is not implemented | ‘संविधान दिना’ची अंमलबजावणीच नाही

‘संविधान दिना’ची अंमलबजावणीच नाही

Next
पुणो : भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो; परंतु राज्यातील अनेक कार्यालयांत हा दिन साजरा केला जात नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये तर या दिनाची माहितीच नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्य शासन या दिनाची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत असल्याचे समोर येत आहे. 
भारतातील घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर 26 जानेवारी 195क्पासून देशभर तिची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जावा, अशी लोकशहीप्रेमी संस्था-संघटना यांची मागणी होती. तिला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासनाने दि. 24 नोव्हेंबर 2क्क्8 रोजी शासन निर्णय घेऊन राज्यभर ‘संविधान दिन’ साजरा करावा, असा आदेश निर्गमित केला. परंतु, सध्या राज्यात या दिनाची अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले आहे. 
या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालयांत ‘संविधान दिन’ साजरा करावा, असे म्हटले आहे. यात संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करावे, संविधानाची रॅली काढावी, त्यातील मूलभूत हक्क, कर्तव्ये, जबाबदा:या यांचे बॅनर, पोस्टर लावले नाहीत. संविधान रॅली अथवा मूलभूत हक्क, कर्तव्य यावर मान्यवरांची व्याख्याने ठेवणो आवश्यक असते; परंतु यांपैकी काहीच झालेले नाही, असे पवार म्हणाले.  (प्रतिनिधी)
 
अनेकांना नाही माहिती 
4ग्रामपंचायत, पंचायत समिती, महाविद्यालये या ठिकाणी ‘संविधान दिना’बद्दल काहीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. 
4बहुतेक जिल्हाधिकारी कार्यालयांत विचारणा केल्यानंतर संविधान दिनाचा अहवालच उपलब्ध नाही. काही शासकीय कार्यालयांनी केवळ संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केलेले आहे.  
 
4शिक्षक हितकारिणी संघटनेचे अध्यक्ष      प्रा. प्रकाश पवार यांनी माहिती अधिकारात ही माहिती समोर आणली आहे. 

 

Web Title: The Constitution Day is not implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.