रेल्वेच्या नुसत्या घोषणाच

By admin | Published: February 25, 2015 01:42 AM2015-02-25T01:42:38+5:302015-02-25T01:42:38+5:30

मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या सोलापूर विभागाचे कार्यक्षेत्र ९६० कि.मी. इतके असून, होटगी, कुर्डूवाडी, दौंड अशी तीन मोठे जंक्शन आहेत.

The only announcement of the train | रेल्वेच्या नुसत्या घोषणाच

रेल्वेच्या नुसत्या घोषणाच

Next

सोलापूर : मध्य रेल्वे अंतर्गत येणा-या सोलापूर विभागाचे कार्यक्षेत्र ९६० कि.मी. इतके असून, होटगी, कुर्डूवाडी, दौंड अशी तीन मोठे जंक्शन आहेत. असे असतानाही कुर्डूवाडी रेल्वे कारखाना, सहा वर्षांपूर्वी घोषणा झालेला पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्ग आणि २०१२-१३ रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा झालेला पंढरपूर-विजापूर रेल्वेमार्ग आदी घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. यासाठी निधीची तरतूद न केल्याने सोलापूरची रेल्वे धक्कागाडी बनली आहे.
कुर्डूवाडी (ता. माढा) येथील रेल्वे कारखाना १९३२ सालापासून सुरू आहे. नॅरोगेज रेल्वे असताना या कारखान्यात डबे बनविण्यात येत असत. नॅरोगेजचे ब्रॉडगेज झाल्यानंतर या कारखान्याचे रूपांतर ब्रॉडगेज डबे बनविण्यासाठी होणे अपेक्षित होते. मात्र तसे काही झाले नाही. दिल्लीच्या रेल्वे बोर्डने या कारखान्याकडे गरजांची विचारणा केली ती २००६ साली. तेव्हा कारखाना प्रशासनाने १०० कोटींची गरज असल्याचे सांगितले. याला वित्त आयोगाने मंजुरीही दिली. मात्र अद्यापपर्यंत निधी उपलब्ध न झाल्याने या कारखान्याचे काम बंदच आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण लातूर-मिरज, हैदराबादसाठी मध्यवर्ती आहे. ४५ वर्षांपूर्वी पंढरपूर-लोणंद मार्गासाठी भू-संपादन करण्यात आले. मात्र भू-संपादन केलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. सहा वर्षांपूर्वी या मार्गाची घोषणा झाली. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने हा मार्ग प्रतीक्षेतच आहे. पंढरपूर-लोणंद मार्ग झाल्यास या भागात असणाऱ्या सहा साखर कारखान्यांना साखर वाहतूक, कच्चा माल, फळे, भाजीपाला निर्यातीला चालना मिळणार आहे. २०१२-१३च्या रेल्वे बजेटमध्ये पंढरपूर-विजापूर मार्गाची घोषणा झाली. मात्र यासाठी २०१३च्या बजेटमध्ये काहीच तरतूद झाली नाही. यामुळे हा मार्गही पुढील घोषणा व तरतुदीच्या प्रतीक्षेत आहे.
प्रत्येक वर्षी अन्य विभागांना नवीन गाड्यांची तरतूद करण्यात येते. मात्र सोलापूरसाठी हात कायमचा आखडता घेतला आहे. बाळे मालधक्क्यासाठी असलेला निधी कलबुर्गीकडे पळविल्याने सध्या हा मालधक्का उघड्यावरच आहे. पावसाळ्यात माल भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Web Title: The only announcement of the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.