हिट अँड रन प्रकरणी सलमानला ५ वर्षांची शिक्षा

By admin | Published: May 6, 2015 11:33 AM2015-05-06T11:33:27+5:302015-05-06T18:03:16+5:30

बहुचर्चित व गेली तेरा वर्षे चाललेल्या हिट अँड रन खटल्यात सलमान खानला दोषी ठरवण्यात आले असून त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Salman gets 5 years of education in hit and run case | हिट अँड रन प्रकरणी सलमानला ५ वर्षांची शिक्षा

हिट अँड रन प्रकरणी सलमानला ५ वर्षांची शिक्षा

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ - बहुचर्चित व गेली तेरा वर्षे चाललेल्या हिट अँड रन खटल्यात सलमान खानला दोषी ठरवण्यात आले असून त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सलमानला आज कोर्टातूनच तुरूंगात नेण्यात येणार असून सुरक्षेच्या कारणास्तव त्याला आर्थर रोड तुरूंगाऐवजी तळोजा किंवा ठाणे येथील कारगृहात हलवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास न्यायाधीशांनी सलमानला दोषी ठरवले. अपघातावेळी सलमान मद्यप्राशन करून गाडी चालवत होता, त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हते असे सांगत कोर्टाने त्याला दोषी ठरवले. तुझ्यावरील सर्व आरोप सिद्ध झाले आहेत, तुझे काय म्हणणे आहे असा प्रश्न न्यायाधीशांनी सलमानला विचारला असता त्याने काही उत्तर न देता आपले वकील शिवदे यांच्याकडे पाहिले आणि त्यानंतर शिवदे यांनी युक्तिवाद सुरू केला.

सलमानच्या डोळ्यात तरळले अश्रू

सलमान बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात पोचला तेव्हा रिलॅक्स मूडमध्ये होता मात्र  न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर तो घामाघूम झाला, त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तर निकाल ऐकून त्याच्या कुटुंबियांची घोर निराशा झाली, त्याच्या आईची तब्येतही बिघडल्याचे समजते. अलविरा, अर्पिता या त्याच्या बहिणींना अश्रू अनावर झाले.  

२८ सप्टेंबर २००२ हिट अँड रन प्रकरण घडले. सलमानने लँड कु्रझर गाडी भरधाव चालवत वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळील फुटपाथवर चढवली. पदपथावर झोपलेले पाच जण गाडीखाली चिरडले गेले. यातील एकाचा बळी गेला. याप्रकरणी सलमानविरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता. मात्र २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. 

 

खटल्यातील महत्त्वाच्या तारखा

२८ सप्टेंबर २००२ रोजी ही घटना घडली. त्याच दिवशी सलमानला अटक झाली व त्याची जामिनावर सुटकाही झाली.

 

७ आॅक्टोबर २००२ सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी पुन्हा सलमानला अटक झाली व त्यानंतर त्याला जामीनही मंजूर झाला.

 

२००३ बचाव पक्षाने सदोष मनुष्यवधाच्या आरोपाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला. सरकारी पक्षाने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने याचा निर्णय सुनावणी न्यायालयावर सोडला.

 

२००६ मध्ये वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात याचा खटला सुरू.

२०११सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यासाठी सरकारी पक्षाने विशेष न्यायालयात अर्ज केला.

३१ जानेवारी २०१३ - वांद्रे न्यायालयाने सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यास परवानगी दिली.

२८ एप्रिल २०१४ : सत्र न्यायालयात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू झाला.

 

सलमानवरील आरोप

सदोष मनुष्यवध 

भरधाव गाडी चालवणे 

निष्काळजीपणा

गंभीर दुखापत करणे 

 

किरकोळ दुखापत करणे - दोन महिने

 

 

Web Title: Salman gets 5 years of education in hit and run case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.