याकूब मेमन मुंबईत दफन
By Admin | Published: July 30, 2015 09:48 AM2015-07-30T09:48:17+5:302015-07-30T18:24:35+5:30
मुंबई बाँबस्फोटाप्रकरणी फाशी झालेल्या याकूब मेमनच्या मृतदेहाला मुंबईतील बडा कब्रिस्तान येथे दफन करण्यात आले.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - मुंबई बाँबस्फोटाप्रकरणी फाशी झालेल्या याकूब मेमनच्या मृतदेहाला गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील मरिन लाईन्स येथील बडा कब्रिस्तान येथे दफन करण्यात आले.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी याकूब मेमनला गुरुवारी सकाळी नागपूरमधील तुरुंगात फाशी देण्यात आली. याकूबच्या शेवटच्या इच्छेनुसार दुरध्वनीव्दारे याकूबचे त्याच्या मुलीशी बोलणे झाले. याकूबला फाशी दिल्यानंतर त्याचा मोठा भाऊ सुलेमान व उस्मान हे दोघे नागपूर मध्यवर्ती कारागृहात पोहोचले. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यावर याकूबचा मृतदेह त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यानंतर विमानाने याकूबचा मृतदेह मुंबईत आणण्यात आला. विमानतळावरुन माहिम येथील निवासस्थानी याकूबचा मृतदेह नेण्यात आला. या संपूर्ण घटनेदरम्यान मुंबई पोलिसांनी याकूब मेमनच्या घराजवळ कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास मरिन लाईन्स येथील बडा कब्रिस्तान येथे याकूबच्या मृतदेह दफन करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ४०० हून अधिक व्यक्तींना ताब्यात घेतले होते.