राष्ट्रीय महामार्ग होणार ग्रीन हायवे - गडकरी

By admin | Published: September 29, 2015 02:55 AM2015-09-29T02:55:33+5:302015-09-29T02:55:33+5:30

देशभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार असून यातून ५ लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच बीपीटी आणि जेएनपीटीच्या

National highway will be green highway - Gadkari | राष्ट्रीय महामार्ग होणार ग्रीन हायवे - गडकरी

राष्ट्रीय महामार्ग होणार ग्रीन हायवे - गडकरी

Next

मुंबई : देशभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार असून यातून ५ लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच बीपीटी आणि जेएनपीटीच्या माध्यमातून २०० मेगावॅट वीज तयार केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांना दिली.
राष्ट्रीय महामार्गासाठी दीड लाख किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याचे लक्ष्य असून महामार्गाच्या दुतर्फा झाडी आणि मधोमध रंगीत फुलांचे ताटवे असावेत यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नरेगाच्या माध्यमातून नर्सरींची उभारणी करण्यासाठी मदत केली जाणार असून त्यातून बेरोजगार युवकांना काम मिळेल. झाडे लावण्याचे व जगवण्याचे काम स्वयंसेवी संस्था, तरुण बेरोजगारांना देण्यात येणार असून झाडांना नंबर लावलेले असतील. त्यासाठी गुगल आणि अंतराळ वैज्ञानिकांची मदत घेतली जाईल. ग्रीन हायवेच्या माध्यमातून देशात हिरवेगार रस्ते उभे राहतील, असेही गडकरी म्हणाले.
येत्या तीन महिन्यात या कामाचा शुभारंभ होईल. झाडे लावताना झाडांच्या दुतर्फा कुंभाराकडून बनविण्यात येणारे दोन माठ ठेवले जातील, त्यात पाणी भरले जाईल जे झिरपून झाडांना मिळेल. यातून कुंभारांनाही काम मिळेल.
याआधी झाडे लावण्याचे काम रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांना दिले जात होते, यापुढे ते काम एनजीओ आणि सुशिक्षीत तरुणांकडून करुन घेतले जाईल. काही हायवेच्या भोवतीची जागा सरकार ताब्यात घेणार असून त्याठिकाणी ट्रक टर्मिनन्स, स्वच्छता गृहे, ढाबे यांची उभारणी केली जाईल. शिवाय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आजुबाजूच्या गावातील हस्तकलेच्या वस्तू, खाद्यपदार्थ यांचे स्टॉल ठेवले जातील. काही महत्वाच्या महामार्गांवर हेलीपॅडदेखील उभारले जाणार आहेत, अशी माहिती गडकरी यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: National highway will be green highway - Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.