सुधींद्र कुलकर्णींवर शाईफेक, शिवसेनेने शाई फेकल्याचा आरोप

By admin | Published: October 12, 2015 09:57 AM2015-10-12T09:57:41+5:302015-10-12T12:43:15+5:30

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरींच्या पुस्तक प्रकाशनाचे आयोजन करणारे सुधींद्र कुलकर्णींवर अज्ञात व्यक्तींनी शाई फेकली.

Shayfek, Sudheendra Kulkarni accused of throwing ink | सुधींद्र कुलकर्णींवर शाईफेक, शिवसेनेने शाई फेकल्याचा आरोप

सुधींद्र कुलकर्णींवर शाईफेक, शिवसेनेने शाई फेकल्याचा आरोप

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १२ - मुंबईत पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करणारे भाजपा नेते सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर सोमवारी अज्ञात व्यक्तींनी शाई फेकली. शिवसेना कार्यकर्त्यांनीच शाई फेकल्याचा आरोप सुधींद्र कुलकर्णी यांनी केला असून मुंबई पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे. 

सोमवारी वरळीतील नेहरु तारांगणमध्ये पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या 'नायदर द हॉक नॉर द डव्ह' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाजपा नेते सुधींद्र कुलकर्णी या संस्थेचे प्रमुख आहेत. गुलाम अलींपाठोपाठ शिवसेनेने कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमालाही तीव्र विरोध दर्शवला आहे. तर सुधींद्र कुलर्णी यांनी कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम होणार अशी भूमिका घेतली होती. 

सोमवारी सकाळी सुधींद्र कुलकर्णी गाडीतून जात असताना अज्ञात व्यक्ती त्याच्या गाडीजवळ आली व त्याने कुलकर्णी यांच्या चेह-यावर शाई फेकली. शाई फेकणा-यांनी याप्रसंगी कोणतीही घोषणाबाजी केलेली नाही. या घटनेमागे शिवसेनेचा हात असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत या घटनेविषयी म्हणाले, शिवसेनेसोबत सर्वसामान्यांमध्येही पाकविरोधात संताप आहे, लोकांच्या संतापाचा स्फोट कसा होईल हे कोणालाच माहित नसते. ही एक सौम्य प्रतिक्रिया असल्याचे विधान त्यांनी केले आहे. मात्र या घटनेमागे शिवसेनेचा हात आहे की नाही याचे थेट उत्तर देणे त्यांनी टाळले आहे.  

Web Title: Shayfek, Sudheendra Kulkarni accused of throwing ink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.