'ते' अवशेष शीना बोराचेच - एम्सचा अहवाल
By admin | Published: November 19, 2015 12:38 PM2015-11-19T12:38:19+5:302015-11-19T12:45:29+5:30
रायगड जिल्ह्यातील पेणजवळील जंगलात सापडलेले मानवी अवशेष हे शीना बोराचेच असल्याचा अहवाल दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) विभागाने दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - रायगड जिल्ह्यातील पेणजवळील जंगलात सापडलेले मानवी अवशेष हे शीना बोराचेच असल्याचा अहवाल दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) विभागाने दिला आहे. बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणाता तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर एम्समधील न्यायवैद्यक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पेणजवळील गागोदे खुर्दच्या जंगलात सापडलेल्या मानवी अवशेषांचे नमुने घेतले होते. त्या नमुन्यांची चाचणी केल्यानंतर ते अवशेष शीनाचेच असल्याचे स्पष्ट झाले असून हा अहवाल सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.
या अहवालानंतर आता सीबीआय या प्रकरणी शीनाची आह इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्यामवर राय या तीन आरोपींविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. या प्रकरणी या तिघांना मुंबई पोलिसांनीच अटक केली होती. हे सर्व सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.