टायगरकडून मायकल जॅक्सनला नृत्यांजली, नागपूरकर मंत्रमुग्ध

By Admin | Published: July 12, 2017 06:32 PM2017-07-12T18:32:39+5:302017-07-12T23:37:04+5:30

डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ याने आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकल जॅक्सन याला आज नागपूरमध्ये कोराडी मार्गावरील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इन्डोअर स्टेडियममध्ये...

Michael Jackson dances from Tiger, Nagpuric Enchanted | टायगरकडून मायकल जॅक्सनला नृत्यांजली, नागपूरकर मंत्रमुग्ध

टायगरकडून मायकल जॅक्सनला नृत्यांजली, नागपूरकर मंत्रमुग्ध

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 12 - डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ याने आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकल जॅक्सन याला आज नागपूरमध्ये कोराडी मार्गावरील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इन्डोअर स्टेडियममध्ये अनोखी नृत्यांजली वाहिली. लोकमत आणि प्रीति आयआयटी पिनॅकल यांच्या सहयोगाने  मायकल जॅक्सनला नृत्यांजली म्हणून टायगरचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. टायगर श्रॉफ याने अभिनेत्री निधी अगरवालसमवेत दिलखेचक अदांसह ठेका धरला. यावेळी मुन्ना मायकलच्या कलाकारांसोबत सेल्फी काढण्यासाठी सर्वांची झुंबड उडाली होती.


यावेळी बोलताना टायगर श्रॉफनं लोकमतचे आभार मानले. तो म्हणाला, लोकमतने आंतरराष्ट्रीय नृत्यसम्राट मायकेल जॅक्सनला अनोख्या प्रकारे श्रद्धांजली वाहण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. याचबरोबर माझा आगामी चित्रपट "मुन्ना मायकल"चं इतक्या मोठ्या संख्येने नागपूरकरांनी स्वागत केलं; त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे आणि माझ्या पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा मिळाली आहे.

Web Title: Michael Jackson dances from Tiger, Nagpuric Enchanted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.