तिकिटांवर आता बारकोड

By admin | Published: March 9, 2016 05:42 AM2016-03-09T05:42:15+5:302016-03-09T05:42:15+5:30

तिकिटांतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्यक्षात आता रेल्वेने बारकोड प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तिकिटांवरच बारकोड प्रणालीची छपाई होणार असून

Barcode now on tickets | तिकिटांवर आता बारकोड

तिकिटांवर आता बारकोड

Next

मुंबई : तिकिटांतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्यक्षात आता रेल्वेने बारकोड प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तिकिटांवरच बारकोड प्रणालीची छपाई होणार असून, दिल्लीत हा नवा प्रयोग लांब पल्ल्याच्या अनारक्षित तिकिटांवर १ मार्चपासून करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर, मुंबईतील लोकल आणि अनारक्षित तिकिटांवरही बारकोड प्रणालीचा वापर करण्याचा विचार केला जात आहे.
लांब पल्ल्याच्या अनारक्षित तिकिटांवर तारीख, वेळ, तसेच ठिकाणांची माहिती असते. मात्र, या तिकिटांबाबत गैरप्रकार होत असल्याचे आढळले आहे. एखाद्या तिकिटाची रंगीत झेरॉक्स घेतली जाते किंवा स्कॅनिंगच्या सहाय्याने आणखी एक तिकीट काढले जाते. अशा प्रकारे अनेक प्रवासी तिकिटात गैरप्रकार
करत असल्याने रेल्वेचे उत्पन्न बुडत आहे.
तिकिटांतील हे गैरप्रकार टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे सध्या काही उपाय नाहीत. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने बारकोड यंत्रणा लागू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा पहिला प्रयोग अनारक्षित तिकिटांवर लागू करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बारकोड नसलेली तिकिटे आणि प्रवासी पकडण्यास मदत मिळणार असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. हा प्रयोग दिल्लीत सुरू करण्यात आला आहे. हाच प्रयोग मुंबईतील लोकल तिकीट आणि अनारक्षित तिकिटांसाठी सुरू करण्याचा विचार केला जात आहे. दिल्लीत सुरू केलेला प्रयोग हा प्रयोगिक तत्त्वावर असून, तो यशस्वी झाल्यानंतर मुंबई लागू केला जाईल.
बारकोड नसलेल्या तिकिटाचा छडा लावणे शक्य
बारकोड नसलेल्या तिकिटांचा छडा लावणे टीसींना शक्य होणार आहे. यासाठी स्मार्ट फोनचा वापर केला जाईल. स्मार्ट फोनमधील विशिष्ट अ‍ॅपद्वारे छडा लावता येईल. यापुढे टीसींना हँड हेल्ड मशीनही देण्यात येणार आहे, असे क्रिसचे महाव्यवस्थापक-मुंबई विभाग उदय बोभाटे यांनी सांगितले.
तिकीट खिडकीवर तिकीट घेतल्यास त्यावर बारकोडची छपाई असेल. त्यामुळे रेल्वेकडे तिकिटांची सर्व माहिती उपलब्ध असेल. एखादा बारकोड नसलेले तिकीट आणि प्रवासी पकडल्यास विशिष्ट मोबाइल अ‍ॅप किंवा हँड हेल्ड मशिनद्वारे तिकीट तपासले जाईल. त्यामुळे टीसीला ते तिकीट खोटे असल्याचे तत्काळ समजेल. तिकिटावर बारकोड असल्यास टीसीकडे असलेल्या यंत्रणेत त्याची सविस्तर माहिती मिळेल.

Web Title: Barcode now on tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.