देवनार डम्पिंग धुमसतेच !
By admin | Published: March 28, 2016 12:37 AM2016-03-28T00:37:31+5:302016-03-28T00:37:31+5:30
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या आगीने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असतानाच येथील आग अजूनही धगधगतीच आहे. रविवारी पुन्हा देवनार
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या आगीने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असतानाच येथील आग अजूनही धगधगतीच आहे. रविवारी पुन्हा देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याने पेट घेतला.
डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला लागलेल्या आगीने मुंबई महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ आणले असतानाच रविवारी पुन्हा येथील कचऱ्याने पेट घेतला. आगीवर नियंत्रण मिळवण्यास घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आठ फायर इंजिन, सात वॉटर टँकर्स आणि महापालिकेकडून सात वॉटर टँकर्स पाठवण्यात आले आल्याची माहिती आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
आगीचा भडका उडू नये, म्हणून घटनास्थळी ‘कूलिंग आॅपरेशन’ही हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारीच डम्पिंग ग्राउंडच्या आगीच्या प्रश्नाहून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली देवनारमध्ये रास्तारोको करत महापालिका प्रशासनाचा निषेध केला होता. (प्रतिनिधी)