टीम इंडियाचा नाद करायचा नाय - सोशल मिडीया

By Admin | Published: March 28, 2016 11:55 AM2016-03-28T11:55:46+5:302016-03-28T16:25:55+5:30

टीम इंडियाने रविवारी रात्री ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या 'विराट' विजयानंतर मेसेजिंग अॅप व्हॉटस अॅपवर टीम इंडियाच्या नादी न लागण्याचे मेसेजेस फिरत आहेत.

Team India is not interested - Social media | टीम इंडियाचा नाद करायचा नाय - सोशल मिडीया

टीम इंडियाचा नाद करायचा नाय - सोशल मिडीया

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २८ - टीम इंडियाने रविवारी रात्री ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या 'विराट' विजयानंतर मॅसेंजिंग अॅप व्हॉटस अॅपवर टीम इंडियाच्या नादी न लागण्याचे मेसेजेस फिरत आहेत. सोशल मिडिया फेसबुक, टि्वटरवर विजयाचा नायक असलेल्या विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत असून, क्रिकेटमध्ये नव्या देवाचा उदय झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवली आहे. एकहाती सामना फिरवणारा विराट व्हॉटस अॅपवर बाहुबली बनला आहे. 
 
विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या प्रेमाचा 'दी एन्ड' झाला असला तरी, नेटीझन्स अजूनही अनुष्काला विसरले नसल्याचे मेसेजेसमधून दिसत आहे. भारताच्या वर्ल्डकप विजयापर्यंत विराटच्या कामगिरीत सातत्य टिकून रहावे म्हणून विराटला व्हॉटस अॅपवरच्या मेसेजेसमध्ये अनुष्कापासून दूर रहाण्याचा सल्ला दिला आहे. 
 
मागच्यावर्षी वर्ल्डकपस्पर्धेच्यावेळी विराटचा उत्साह वाढवण्यासाठी अनुष्का थेट ऑस्ट्रेलियात जाऊन पोहोचली होती. मात्र त्यानंतर विराटची कामगिरी उंचावण्याऐवजी ढासळली. ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर तर, सोशल मिडीयावरुन अनुष्काची खिल्ली उडवणारे मॅसेजेस फिरत होते.  त्यावेळी विराटने स्वत: हस्तक्षेप करुन अनुष्काला जबाबदार धरु नका असे स्पष्टीकरण द्यावे लागले होते. 
 
भारताच्या विजयानंतर व्हॉटस अॅपवर फिरणारे काही गंमतीशीर मेसेज आणि फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
स्टीव स्मिथ: भावांनो आज आमचा ईस्टर संडे आहे त्यामुळ मॅच आम्हीच जिंकणार.
 
एम्.एस.धोनी: भावा आमची पण संकष्टी आहे आज विसरु नको.
 
 
***ब्रेकिंग न्यूज***
ऑस्ट्रेलियन पूर्ण टीम अनुष्का शर्माच्या घरी, वैनी तुम्ही मैच बघायला अलंच पाहिजेचा आग्रह............. 
 
Dhoni comes in 14th over
 
Kohli : dhoni bhai, bahut run banaane hai
 
Dhoni : abey run tereko banane hai. Mai to winning shot maarne aaya hu
 
आस्ट्रेलियावालो‬ को
पता नहीं है की
#हम_इंडियावाले चाहे कितना भी
#टारगेट हो
#मार्च में पूरा कर हि देते है...
‪#‎सही_है_ना___‬
 
 

Web Title: Team India is not interested - Social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.