पद्मावतीसाठी दीपिका पदुकोणनं घेतले 11 कोटी
By Admin | Published: August 30, 2016 01:07 PM2016-08-30T13:07:03+5:302016-08-30T13:07:03+5:30
मस्तानीच्या रोलमध्ये वाहवा मिळवलेली दीपिका पदुकोण पद्मावतीमध्ये चित्तोडगडची राणी पद्मिनीची भूमिका करण्यास सज्ज झाली आहे.
![Deepika Padukone took 11 crores for Padmavati | पद्मावतीसाठी दीपिका पदुकोणनं घेतले 11 कोटी Deepika Padukone took 11 crores for Padmavati | पद्मावतीसाठी दीपिका पदुकोणनं घेतले 11 कोटी](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/oldfiles/2016-08-30~deepika_ns.jpg)
पद्मावतीसाठी दीपिका पदुकोणनं घेतले 11 कोटी
>ऑनलाइन लोकमत
मस्तानीच्या रोलमध्ये वाहवा मिळवलेली दीपिका पदुकोण पद्मावतीमध्ये चित्तोडगडची राणी पद्मिनीची भूमिका करण्यास सज्ज झाली आहे. संजय लीला भन्साळीच्या या चित्रपटात रणवीर सिंह अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका करणार आहे तर पद्मिनीचा पती राजा रतन रावळ सिंहाच्या भूमिकेत शाहीद कपूर झळकणार आहे.
जागतिक स्तरावर मानधनाच्या बाबतीत 10व्या क्रमांकावर असलेल्या दीपिकाने पद्मावतीसाठी रणवीर सिंहपेक्षा जास्त 11 म्हणजे कोटी रुपयांचे मानधन घेतले असल्याचे वृत्त आहे. रणवीर सिंहने सात ते आठ कोटी रुपयांचे मानधन घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोहेनजो दारोसारखा सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे इरॉस इंटरनॅशनलने पद्मावती बनवताना बजेटकडे लक्ष द्यावे अशी सूचना केल्याचे सांगण्यात येत आहे.
पद्मावती हा 12 व्या शतकातल्या अल्लाउद्दिन खिलजीने राणी पद्मिनीच्या मोहापायी चित्तोडवर केलेल्या आक्रमणावर व त्यानंतर पद्मिनीसह शेकडो महिलांनी केलेल्या जोहारवर बेतलेला चित्रपट आहे.