वचननाम्याच्या विरोधात बोलेल तो मुंबईद्रोही - उध्दव ठाकरे
By admin | Published: January 23, 2017 02:01 PM2017-01-23T14:01:38+5:302017-01-23T14:06:35+5:30
शिवसेनेच्या वचननाम्याविरोधात बोलेल, तो 'मुंबईद्रोही' असेल असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - शिवसेनेच्या वचननाम्याविरोधात बोलेल, तो 'मुंबईद्रोही' असेल असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला. शिवसेना-भाजपाची युती तुटल्याचे संकेत मिळत असतानाच 23 डिसेंबर बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी 'जे बोलतो ते करुन दाखवतो' या टॅगलाईनखाली शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी वचननामा जाहीर केला आहे.
वचननामा प्रकाशित झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसह राज्यातील भाजपा सरकारही टीका केली. महापालिका शाळेत शिक्षणाचा दर्जा उत्तम आहे व्हर्चुअल क्लासरूमच्या माध्यमातून तज्ञ विद्यार्थ्याशी संवाद साधतात हा संवाद दोन्ही बाजूनी असतो मन की बात सारखा एकतर्फी नसतो. असे म्हणत त्यांनी मोदी यांच्यावरही टीका केली. शिवसेने जाहिर केलेल्या वचननाम्याती घोषणा ह्या केवळ महापालिका करु शकेल अशाच केल्या आहे. राज्य व केंद्राचा सहभाग असलेली एकही योजना नाही असेही ते म्हणाले.
माफीया वगैरे बोलणा-यांच्या पक्षातच माफीया येत आहेत त्यांच्या बाबत काय बोलणार असे म्हणतं उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या किरीट सोमय्यांवरही निशाना साधला.
युतीबाबतची बोलणी संपलेली नाहीत, शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीमुळे आम्हाला 23 जानेवारीचे महत्त्व आहे म्हणून हा वचननामा सादर केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.