पीएमपीला ६० लाखांचे उत्पन्न

By admin | Published: September 2, 2016 05:43 AM2016-09-02T05:43:02+5:302016-09-02T05:43:02+5:30

बीआरटी प्रकल्पाच्या वर्धापन दिनानिमित्त पीएमपील प्रशासनाने १४ आॅगस्ट २०१६ ते ३१ आॅगस्टदरम्यान ५० रुपयांमध्ये एकदिवसीय सवलत पास देण्याचा उपक्रम राबविला.

PMP yields 60 lakhs | पीएमपीला ६० लाखांचे उत्पन्न

पीएमपीला ६० लाखांचे उत्पन्न

Next

पिंपरी : बीआरटी प्रकल्पाच्या वर्धापन दिनानिमित्त पीएमपील प्रशासनाने १४ आॅगस्ट २०१६ ते ३१ आॅगस्टदरम्यान ५० रुपयांमध्ये एकदिवसीय सवलत पास देण्याचा उपक्रम राबविला. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता या उपक्रमाला २८ फेबु्रवारीपर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून या सवलतीच्या पासला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, पंधरा दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरातून ६० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. सुमारे एक लाख सतरा हजार पासची विक्री झाली आहे. सर्वाधिक उत्पन्न निगडीतून मिळाले आहे.
यामध्ये पिंपरी विभागातून पंधरा दिवसांत ३५ हजार ७०६ प्रवाशांनी सवलतीच्या पासचा लाभ घेतला. यातून पीएमपीएला १७ लाख ८५ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. या पंधरा दिवसांमध्ये पतेती व रक्षाबंधन या दोन सणांच्या दिवशी प्रवाशांनी सवलतीच्या पासचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्यामुळे सुमारे तीन लाखांचे उत्पन्न मिळाले होते. दरम्यान, पिंपरी-कात्रज, संभाजीनगर-पुणे, पिंपरी औंधमार्गे पुणे स्टेशन, पुणे मनपा, मार्केट यार्ड या मार्गांवरील बसेसला उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने या मार्गांवरच सवलतीच्या पासची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती पिंपरीचे पीएमपी डेपोचे व्यवस्थापक शांताराम वाघेरे यांनी दिली. तर निगडी विभागातून ४१ हजार ७५१ प्रवाशांनी सवलतीच्या पासचा लाभ घेतल्याने यातून पीएमपीला २० लाख ८७ हजार ५५० रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, पतेती आणि रक्षाबंधन या दोन सणांना निगडी विभागातूनदेखील सवलतीच्या पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या दोन पीएमपीला दिवसात पावणेदोन लाखांचे उत्पन्न मिळाले होते.(प्रतिनिधी)

निगडी ते पुणे रेल्वे स्टेशन, निगडी ते हडपसर, निगडी ते कात्रज, निगडी ते मनपा या मार्गावरील प्रवाशांनी सवलतीच्या पासचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असल्याची माहिती व्यवस्थापक राजेश रूपानवार यांनी दिली. तसेच भोसरी विभागातून ४० हजार २२१ प्रवाशांनी घेतलेल्या सवलतीच्या पास योजनेतून पीएमपीला २० लाख ११ हजार ५० रुपये एवढे उत्पन्न मिळाले आहे. या विभागातूनदेखील भोसरी ते राजगुरुनगर, भोसरी ते पुणे स्टेशन, पुणे मनपा या मार्गांवर सवलत पास योजनेचा प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतल्याची माहिती भोसरीचे पीएमपील डेपोचे व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिली.

Web Title: PMP yields 60 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.