पुण्याच्या इशिताचे न्यूयॉर्कमध्ये भाषण

By admin | Published: November 20, 2015 03:20 AM2015-11-20T03:20:35+5:302015-11-20T03:20:35+5:30

पुण्यातील विबगौर हायस्कूलमधील इयत्ता पाचवीतील दहा वर्षाची विद्यार्थीनी ईशीता कटयाल हीने नुकतेच न्यु यॉर्क येथील टेड युथ कॉन्फर्समध्ये भाषण दिले. ईशीता ही टेड

Speech of Ishita New York in Pune | पुण्याच्या इशिताचे न्यूयॉर्कमध्ये भाषण

पुण्याच्या इशिताचे न्यूयॉर्कमध्ये भाषण

Next

पुणे : पुण्यातील विबगौर हायस्कूलमधील इयत्ता पाचवीतील दहा वर्षाची विद्यार्थीनी ईशीता कटयाल हीने नुकतेच न्यु यॉर्क येथील टेड युथ कॉन्फर्समध्ये भाषण दिले. ईशीता ही टेड कॉन्फर्समध्ये सर्वात कमी वयात भाषण देणारी पहिली भारतीय विद्यार्थीनी ठरली आले.
टेड संस्था नावीन्यपूर्ण विचार करणा-यांना व्यक्तींना आपले मत मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध देते.या संस्थेच्या वतीने भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही वर्षांपूर्वी भिलवाडा येथील डेट एक्ससाठी तिची निवड झाली होती.त्याच प्रमाणे ईशीताने स्वत: टेडएक्स युथ अ‍ॅट बालेवाडी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ईशीताला लेखनाची आवड असून संभाषण कौशल्य पाहून टेडने तिची निवड न्यू यॉर्क येथील कॉन्फरन्ससाठी केली. ‘लहान मुलांनी मोठे होऊन काय व्हावे’या विषयावर तिने भाषण दिले. इशीता ही मुळची हरियाणा राज्यातील कर्नाल शहरातील रहिवासी आहे. परंतु,गेल्या चार वर्षांपासून ती पुण्यात वास्तव्यास आहे. ईशाताचे वडील आयटी कंपनीत वरिष्ठ पदावर कामावर असून आई नैन्सी कटयाल यांची स्वत:ची प्रशिक्षण कंपनी आहे.
नैन्सी कटयाल म्हणाल्या, ईशाताला लिखानाची आणि वाचनाची खूप आवड आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून ती लघु कथा लिहित आहे. प्रकाशकांनी तिच्या कथांचे प्रकाशन केले आहे . टेड संस्थेने ईशीताचे कौशल्य पाहून तिला 14 नोव्हेंबर रोजी न्यू यॉर्क येथील कॉन्फ र्न साठी पाचारण केले होते. त्यात तिने भविष्यात मुलांनी काय व्हावे याचा विचार न करता आत्ता आपण काय करू शकतो. याचा विचार करावा, पालकांनीही मुलांवर भविष्यात काय व्हावे, याबाबत दबाव टाकू नये,असे मनोनत व्यक्त केले. ईशाताला वाचनाची, लिखानाची आणि आपल्या मित्रांबरोबर खेळण्याची आवड आहे.

Web Title: Speech of Ishita New York in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.