मातोश्री महाविद्यालयातील विद्यार्थ्याची आत्महत्त्या

By admin | Published: December 24, 2015 12:17 AM2015-12-24T00:17:22+5:302015-12-24T00:17:22+5:30

मातोश्री महाविद्यालयातील विद्यार्थ्याची आत्महत्त्या

Suicide of a student of Matoshree College | मातोश्री महाविद्यालयातील विद्यार्थ्याची आत्महत्त्या

मातोश्री महाविद्यालयातील विद्यार्थ्याची आत्महत्त्या

Next

नाशिक : ओढा परिसरातील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़२३) सकाळच्या सुमारास नाशिकरोड परिसरात घडली आहे़ मयत विद्यार्थ्याचे नाव दिपक नंदलाल सानप (१९, रा. विद्यादर्शन सोसायटी, माळी कॉलनी) असे आहे़
ओढा येथील मातोश्री महाविद्यालयातील विद्यार्थी दीपक सानप हा पदविकेच्या अखेरच्या वर्षात होता़सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन त्याचे आत्महत्त्या केली़ त्याचे वडील नंदलाला सानप हे रेल्वेमध्ये कार्यरत असून नंदूरबार येथे राहतात. तर मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी नाशिकरोडमध्ये भाडेतत्त्वावर फ्लॅट घेऊन दिला होता़ त्याठिकाणी तो एकाटाच राहत होता़
दीपकने आत्महत्या करण्यापुर्वी बहिणीला फोन करून आपण जीवन संपवत असल्याचे सांगून लगेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नाशिकरोड पोलीसांनी सांगितले. दरम्यान आत्महत्त्येचे निश्चित कारण समजू शकले नसून या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार व्ही. जी. भोईर करीत आहेत.(प्रतिनिधी)
नाशिक : म. वि. प्र. समाज, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नाशिक विभागीय मंडळ व माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी कृतीपत्रिका आराखडा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Suicide of a student of Matoshree College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.