नाकाबंदीत तपासणी : सवलत फक्त ‘एमएच १०’साठीच; सीमाभागात दक्षता

By Admin | Published: October 6, 2014 10:21 PM2014-10-06T22:21:12+5:302014-10-06T22:31:19+5:30

दररोज नाकाबंदी करून ‘एमएच-दहा’ या पासिंगशिवाय कोणते वाहन दिसले, तर

Blockade Checking: The discount is only for 'MH10'; Efficiency in the border | नाकाबंदीत तपासणी : सवलत फक्त ‘एमएच १०’साठीच; सीमाभागात दक्षता

नाकाबंदीत तपासणी : सवलत फक्त ‘एमएच १०’साठीच; सीमाभागात दक्षता

googlenewsNext

सचिन लाड -सांगली-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची देवाण-घेवाण व पैशांचा पुरवठा होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी परजिल्ह्यातील वाहनांना ‘टार्गेट’ करून तपासणी सुरू ठेवली आहे. दररोज नाकाबंदी करून ‘एमएच-दहा’ या पासिंगशिवाय कोणते वाहन दिसले, तर ते थांबवून तपासणी केली जात आहे. सीमाभागातही विशेष खबरदारी घेऊन २४ तास कडा पहारा दिला जात आहे.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत वाहनांची तपासणी करण्यावर भर दिला होता. याच वाहनातून राज्यभरात सुमारे दोनशे कोटींहून अधिक रक्कम सापडली होती. विधानसभा निवडणुकीतही याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने राज्यातील पोलीस यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
कर्नाटकातून मिथेनॉलमिश्रित दारूची तस्करी होण्याची शक्यता आहे. तसेच शस्त्रांची व पैशांची तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील म्हैसाळ, शिंदेवाडी, लोणारवाडी, सलगरे, मुचंडी, चडचण, तिकोंडी व कोंत्यावबोबलाद या ठिकाणी चेक नाके उभारण्यात आले आहेत.
सांगली व कर्नाटकचे पोलीस संयुक्तपणे चेक नाक्यांवर २४ तास कडा पहारा देत आहेत. त्यांच्या मदतीला उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक तैनात केले आहे. प्रत्येक वाहनाची तसेच कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांचीही तपासणी केली जात आहे. आतापर्यंत कुपवाडमध्ये जवळपास २३ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत हे स्वत: नाकाबंदीच्या पॉर्इंटला भेट देत आहेत. शहरात येणाऱ्या मार्गावरच नाकाबंदी करून ‘एमएच-१०’शिवाय अन्य कोणते वाहन दिसले की ते तपासले जात आहे.

पोलिसांची डोकेदुखी ‘थ्री एम’
कोणत्याही निवडणूकीत ‘मॅन, मनी, मसल’ या ‘थ्री एम’ सूत्राचा वापर होत असल्यामुळे निवडणूक आयोग सतर्क झाल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक मतदारसंघात ‘थ्री एम’ वेगाने प्रचार चालणार आहे. परिणामी निवडणूक आयोग आणि पोलिसांनीही सांगली, मिरज, तासगाव, जत, खानापूर-आटपाडी, वाळवा विधानसभा मतदारसंघावर खास नजर ठेवली आहे.

या
वाहनांवर पोलिसांची नजर...

४ एमएच १२ (पुणे),
४ एमएच ०९ (कोल्हापूर)
४ एमएच ११ (सातारा)
४ एमएच ४२ (बारामती)
४ एमएच ४५ (अकलूज)
४ एमएच ४३ (वाशी-मुंबई)
४ एमएच १४ (पिंपरी-चिंचवड)
४ एमएच १३ (सोलापूर)
४ एमएच ०८ (रत्नागिरी)
४ एमएच ०६ (रायगड-पेण)

दोन पथके जिल्ह्यातील विविध भागात २४ तास फिरत आहेत. परजिल्ह्यातील तसेच आपल्या जिल्ह्यातील संशयास्पद वाहन दिसले तर थांबविले जात आहे. वाहनाची झडती घेण्याबरोबर कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
- हरिश्चंद्र गडसिंग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Blockade Checking: The discount is only for 'MH10'; Efficiency in the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.