दहशतवाद खपवून घेणार नाही -गृहमंत्री

By admin | Published: December 13, 2015 10:42 PM2015-12-13T22:42:41+5:302015-12-13T22:42:41+5:30

रालोआ सरकारने दहशतवाद मुळीच खपवून न घेण्याचे धोरण अवलंबले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी संसद हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करताना स्पष्ट केले.

Terrorism will not be tolerated - Home Minister | दहशतवाद खपवून घेणार नाही -गृहमंत्री

दहशतवाद खपवून घेणार नाही -गृहमंत्री

Next

नवी दिल्ली : रालोआ सरकारने दहशतवाद मुळीच खपवून न घेण्याचे धोरण अवलंबले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी संसद हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करताना स्पष्ट केले.
भारताला सुरक्षित राष्ट्र बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ते एका संदेशात म्हणाले. १४ वर्षांपूर्वी १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्यांचे हौतात्म्य देश कधीही विसरणार नाही. शूर सुरक्षा जवानांनी दाखविलेल्या धैर्याला मी सलाम करतो, असे त्यांनी नमूद केले. पाच बंदूकधाऱ्यांनी संसदेवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दिल्लीचे पाच पोलीस, सीआरपीएफची एक महिला पोलीस अधिकारी, संसदेतील दोन रक्षक आणि एक माळी असे नऊ जण शहीद झाले.
> मोदींच्या उपस्थितीत संसदेत आदरांजली...
लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अल्पसंख्यांक मंत्री नजमा हेपतुल्ला, राज्यसभेचे सभापती पी.जे. कुरियन, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सत्यनारायण जतिया आदी त्यावेळी उपस्थित होते. यावेळी मोदींनी शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवरांनी रविवारी संसद परिसरामध्ये आयोजित कार्यक्रमात शहिदांना आदरांजली अर्पण केली.

Web Title: Terrorism will not be tolerated - Home Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.