जाहिरातीत विष्णूरुपात प्रकटलेल्या धोनी विरोधात अजामीनपत्र वॉरंट
By admin | Published: January 8, 2016 02:33 PM2016-01-08T14:33:29+5:302016-01-08T15:58:13+5:30
भगवान विष्णूच्या रुपात प्रसिध्द झालेल्या छायाचित्रा प्रकरणी महेंद्रसिंह धोनीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - मासिकाच्या मुखपृष्ठावर भगवान विष्णूच्या रुपात प्रसिध्द झालेल्या छायाचित्रा प्रकरणी अनंतपूर न्यायालयाने भारताच्या वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
न्यायालयाने धोनीला २५ फेब्रुवारीला होणा-या सुनावणीच्यावेळी न्यायालयात हजर रहाण्याचे आदेश दिले आहेत. २०१३ मध्ये मासिकाच्या मुखपृष्ठावर धोनीचे भगवान विष्णूच्या रुपातील छायाचित्र प्रसिध्द झाले होते.
बिझनेस टुडे मासिकाच्या मुखपृष्ठावर २०१३ मध्ये धोनीचे भगवान विष्णूच्या रुपातील छायाचित्र प्रसिध्द झाले होते. या छायाचित्रात धोनीने खाण्याच्या विविध वस्तू हातात पकडल्याचे दिसत आहे. धोनीच्या या छायाचित्रामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते जयकुमार हिरेमठ यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
भारतीय दंड विधान सहितेच्या कलम २९५ आणि ३४ अंतर्गत धोनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मी देवाच्या रुपातील माझे छायाचित्र काढले नव्हते तसेच त्या छायाचित्रासाठी मासिकाकडून कोणतेही पैसे घेतले नव्हते असे धोनीने न्यायालयाला सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१५ मध्ये धोनी विरोधातील गुन्हेगारी कारवाईची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले होते. धोनी सध्या ऑस्ट्रेलिया दौ-यावर असून तिथे भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलिया विरुध्द पाच एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे.