हैदराबादेत विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली
By admin | Published: January 25, 2016 02:02 AM2016-01-25T02:02:57+5:302016-01-25T02:02:57+5:30
दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूवरून आमरण उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर
हैदराबाद : दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूवरून आमरण उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी आणखी सात विद्यार्थ्यांनी उपोषणाला सुरुवात केली. विद्यापीठाचे कुलगुरू पी. अप्पा राव यांना हटविण्यात यावे, रोहितच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत, कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि चार विद्यार्थ्यांविरुद्धची निलंबनाची कारवाई बिनशर्त मागे घ्यावी, अशा मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
आमरण उपोषण करणाऱ्या सात विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर रविवारी आणखी सात विद्यार्थ्यांनी त्यांची जागा घेत उपोषणाला प्रारंभ केला. आपल्या पाचही मागण्या मान्य होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील, असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे. दरम्यान, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सात विद्यार्थ्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.