व्हॉट्सअॅप युजर्स १ अब्जच्या घरात

By admin | Published: February 2, 2016 04:52 PM2016-02-02T16:52:14+5:302016-02-02T16:55:26+5:30

मोबाईलवरुन मेसेज करण्यासाठी प्रत्येकासाठी महत्वाचे ठरलेले व्हॉट्सअॅप आता १०० कोटी लोकांपर्यंत पोहचले आहे.

WhitsAype users 1 billion home | व्हॉट्सअॅप युजर्स १ अब्जच्या घरात

व्हॉट्सअॅप युजर्स १ अब्जच्या घरात

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - मोबाईलवरुन मेसेज करण्यासाठी प्रत्येकासाठी महत्वाचे ठरलेले व्हॉट्सअॅप आता  १०० कोटी लोकांपर्यंत पोहचले आहे.
आजघडीला व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या १०० कोटीच्या घरात पोहचली आहे. जगभरात प्रत्येक महिन्याला सातपैकी एक जण व्हॉट्सअॅपचा युज आपल्या मित्रांना, नातेवाईकांना मेसेज करणासाठी करत असल्याचे व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे.
फेब्रुवारी २०१४ मध्ये फेसबुकने १९अब्ज डॉलरमध्ये व्हॉट्सअॅपची खरेदी केली होती. आत्तापर्यंत फेसबुककडून करण्यात आलेला हा सर्वात मोठा व्यवहार होता. फेसबुकवर एका पोस्टमध्ये व्हॉट्सअॅपचा सह-संस्थापक जॉन कोउमने सांगितलं की, या प्लॅटफॉर्मवर दररोज ४२ अब्ज मेसेज, १.६ अब्ज फोटो आणि २५ कोटी व्हिडिओ शेअर केले जातात.
दरम्यान, फेसबुकचे संस्थापक आणि व्हॉट्सअॅपचा मालक मार्क झुकरबर्गनं फेसबुकवरुन व्हॉट्सअॅप युजर्सचे आभार मानले आहेत. 

One billion people now use WhatsApp. Congrats to Jan, Brian and everyone who helped reach this milestone! WhatsApp's...

Posted by Mark Zuckerberg on Monday, February 1, 2016

Web Title: WhitsAype users 1 billion home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.