कोणत्याही परदेशी खेळाडूंना भारतात धोका नाही - अनुराग ठाकूर

By admin | Published: February 10, 2016 05:13 PM2016-02-10T17:13:19+5:302016-02-10T17:13:19+5:30

कोणत्याही परदेशी खेळाडूंना भारतात धोका नाही, भारत हा सुरक्षित देश आहे कोणात्याही खेळाडूंना इथं असुरक्षितता असण्याचं कारण नाही असे बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी आज स्पष्ट केले

Any foreign players are not at risk in India - Anurag Thakur | कोणत्याही परदेशी खेळाडूंना भारतात धोका नाही - अनुराग ठाकूर

कोणत्याही परदेशी खेळाडूंना भारतात धोका नाही - अनुराग ठाकूर

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - कोणत्याही परदेशी खेळाडूंना भारतात धोका नाही, भारत हा सुरक्षित देश आहे कोणात्याही खेळाडूंना इथं असुरक्षितता असण्याचं कारण नाही असे बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी आज स्पष्ट केले आहे. पुढील महिन्यात ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. पाकिस्तानने भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळायचं आहे की नाही हे ठरवावे यापुर्वीही पाक  संघाने सुरक्षेच्या मुद्दयवरुन भारता बरोबरची द्विपक्षीय मालिका खेळली नव्हती असा टोला ठाकूर यांनी पाक क्रिकेट बोर्डाला मारला. 
सुरक्षेच्या मुद्द्यावरून पाक सरकार त्यांच्या संघास भारतात पाठविण्यास परवानगी देणार नाही. सरकारने परवानगी दिली नाही तर पाकिस्तानचे सामने दुबई, शारजाह आणि कोलंबो येथे आयोजित केले जाऊ शकतात असे पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान म्हणाले होते.  मार्च-एप्रिल दरम्यान होणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबाबत दुबई येथे आज झालेल्या आयसीसीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) दिली. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये भारताने द्विपक्षीय मालिका खेळली नव्हती; कारण त्यांना सरकारकडून मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे सरकारच्या निर्णयावर बरेच काही अवलंबून असेल, असेही शहरयार यांनी सांगितले.
 

Web Title: Any foreign players are not at risk in India - Anurag Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.