जेएनयू देशद्रोही घोषणा प्रकरण; दोघांना ३ दिवसांची पोलीस कस्टडी
By Admin | Published: February 24, 2016 10:01 PM2016-02-24T22:01:44+5:302016-02-24T22:01:44+5:30
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोहाचा आरोप असलेले दोन विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य या दोन विद्यार्थांना ३ दिवसांची पोलीस कोठडी दिल्ली न्यायालयाने सुनावली आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोहाचा आरोप असलेले दोन विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य या दोन विद्यार्थांना ३ दिवसांची पोलीस कोठडी दिल्ली न्यायालयाने सुनावली आहे.
काल रात्री (मंगळवारी) उशिरा ते दोघे दिल्ली पोलीसांना शरण आले होते. त्यांना काल (दि.२३) दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांपुढे शरण येण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रात्री उशिरा साडे अकराच्या सुमारास विद्यापीठातून इतर विद्यार्थ्यांसह विद्यापीठाच्या गाडीतून पोलीसांना शरण आले. ते दिल्लीतील वसंत कुंज येथील पोलीस स्टेशनमध्ये शरण होण्यासाठी गेले. यावेळी त्यांना पोलीस विहार पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.
जेएनयू प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. उमर खालीद हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं पुढे आल्यानंतर त्याचा शोध पोलिस घेत होते. जेएनयूप्रकरणानंतर खालीद आणि त्याचे चार सहकारी फरार झाले होते. देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.