राहुल गांधींच्या जेएनयू भेटीची काँग्रेसला लाज वाटायला हवी - अमित शहा

By admin | Published: March 5, 2016 03:52 PM2016-03-05T15:52:47+5:302016-03-05T16:28:09+5:30

राहुल गांधी यांनी जेएनयूला दिलेल्या भेटीची काँग्रेसला लाज वाटायला हवी अशी टीका अमित शहा यांनी केली आहे

Congress should be ashamed of Rahul Gandhi's JNU visit - Amit Shah | राहुल गांधींच्या जेएनयू भेटीची काँग्रेसला लाज वाटायला हवी - अमित शहा

राहुल गांधींच्या जेएनयू भेटीची काँग्रेसला लाज वाटायला हवी - अमित शहा

Next
>ऑनलाइन लोकमत - 
उत्तरप्रदेश, दि. ५ -  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जवाहलाल नेहरु विद्यापीठाला (जेएनयू) दिलेल्या भेटीची काँग्रेसला लाज वाटायला हवी अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांनी जवाहलाल नेहरु विद्यापीठाला (जेएनयू) भेट दिली आणि देशद्रोही घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला याची काँग्रेसला लाज वाटायला हवी असं अमित शहा बोलले आहेत. 
 
जेएनयूमध्ये दिलेल्या घोषणा जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर मग देशद्रोह काय आहे ? काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या राहुल गांधींच्या जेएनयू भेटीच समर्थन करतात का ? असा सवाल अमित शहा यांनी यावेळी विचारला. यावेळी बोलताना अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना पुढील 25 वर्ष आपलीच सत्ता राहील यासाठी जोरदार काम करण्यास सांगितले. पाच वर्षात विकास होईल, विकासदर वाढेल, सीमारेषादेखील सुरक्षीत राहतील मात्र भारताला विश्वगुरु करायचं आहे आणि त्यासाठी भाजपाला 25 वर्ष सत्तेत राहिले पाहिजे असं अमित शहा बोलले आहेत. 
 
अमित शहा यांनी माजी पंतप्रधान मनोहन सिंग यांची खिल्लीदेखील उडवली. मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींपेक्षा जास्त परदेशी दौरे केले मात्र त्यांचा परिणाम खुप थोड्या प्रमाणात झाला. मनमोहन सिंग आपल्या भाषणाची कागद आपल्याकडे ठेवतं जी इंग्लिशमध्ये लिहिलेली असत. मात्र मोदींनी युएनमध्ये हिंदीत भाषण केलं आणि देशाला अभिमान वाटला. मोदींच्या सत्तेत देशात्या सीमारेषा सुरक्षित करण्याचं सर्वात मोठ काम केल्याचा दावा अमित शहा यांनी यावेळी केला. 
 

Web Title: Congress should be ashamed of Rahul Gandhi's JNU visit - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.