मल्ल्या म्हणतात मुलाखत दिली नाही, वृत्तपत्राने पुरावा म्हणून वेबसाईटवर टाकली मुलाखत

By admin | Published: March 15, 2016 12:11 PM2016-03-15T12:11:14+5:302016-03-15T13:26:14+5:30

मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी कोणत्याही वृत्तपत्राला मुलाखत दिली नसल्याचं सांगितल्यानंतर संडे गार्डीयनने मल्ल्यांनी मेलद्वारे दिलेली मुलाखत पुरावा म्हणून आपल्या वेबसाईटवर टाकली आहे

Mallya did not interview, interviewed on the website as evidence of the newspaper | मल्ल्या म्हणतात मुलाखत दिली नाही, वृत्तपत्राने पुरावा म्हणून वेबसाईटवर टाकली मुलाखत

मल्ल्या म्हणतात मुलाखत दिली नाही, वृत्तपत्राने पुरावा म्हणून वेबसाईटवर टाकली मुलाखत

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १५ - मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी कोणत्याही वृत्तपत्राला मुलाखत दिली नसल्याचं सांगितल्यानंतर संडे गार्डीयनने मल्ल्यांनी मेलद्वारे दिलेली मुलाखत पुरावा म्हणून आपल्या वेबसाईटवर टाकली आहे. विजय मल्ल्या यांनी संडे गार्डीयनला कोणतीही मुलाखत दिली नसल्याचं आपल्या ट्विटवरुन सांगितलं आहे. तर दुसरीकडे संडे गार्डीयनने ईमेलद्वारे मल्ल्यांनी मुलाखत दिल्याचा दावा केला आहे. 
 
'12 मार्च 2016ला आम्ही विजय मल्ल्या यांना ईमेलद्वारे प्रश्न पाठवले होते. विजय मल्ल्या यांनी स्वत: आपल्या vjmallya@protonmail.com या मेल आयडीवरुन याची उत्तर दिली होती. विजय मल्ल्यांच्या कायदेशीर सल्लागार कार्यालयाने हा ईमेलआयडी त्यांचा असल्याचा दुजोरा दिला होता. विजय मल्ल्या नकार का देत आहेत याची कल्पना नाही. मात्र आम्ही अजूनही आमच्या म्हणण्यावर ठाम आहोत', अस संडे गार्डीयनने सांगितलं आहे. 
 
शनिवारी संडे गार्डीयनने विजय मल्ल्या यांची मुलाखत छापली होती. 'मला भारतात यायचं आहे मात्र भारतात येण्याची ही योग्य वेळ नाही' असं विजय मल्ल्या बोलल्याच या मुलाखतीत सांगण्यात आलं होतं. 'मी कुठे आहे याचा खुलासा करणं माझ्यासाठी योग्य नाही. मी कोणताही गुन्हेगार नाहीये ज्याचा पाठलाग करावा. मला सध्या सुरक्षित राहायचं आहे...मी एक दिवस भारतात नक्की परत येईन अशी आशा आहे. मला भारताने सर्व काही दिलं आहे, मला विजय मल्ल्या बनवले आहेट', असं विजय मल्ल्या यांनी मुलाखतीत सांगितल्याचं वृत्तपत्रात झापण्यात आलं होतं.
 
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह १७ बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 7 हजार करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. 2 मार्चला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.
 
 
Shocked to see Sunday Guardian's claim that I exchanged mails with them from my protonmail account. Have never heard of protonmail before.

Web Title: Mallya did not interview, interviewed on the website as evidence of the newspaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.