पाकिस्तानचं राष्ट्रगीत गाताना चुकलो नाही, इडनवरील म्युझिक सिस्टीम खराब
By admin | Published: March 21, 2016 11:54 AM2016-03-21T11:54:29+5:302016-03-21T12:04:46+5:30
पाकिस्तानी संघाप्रमाणेच इडन गार्डनवर पाकिस्तानचे राष्ट्रगीत गाणारा गायक शफाकत अमानत अलीवर पाकिस्तानात जोरदार टिका सुरु आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २१ - पाकिस्तानी संघाप्रमाणेच इडन गार्डनवर पाकिस्तानचे राष्ट्रगीत गाणारा गायक शफाकत अमानत अलीवर पाकिस्तानात जोरदार टिका सुरु आहे. राष्ट्रगीत गाताना शफाकत अलीने काही ठिकाणी चूक केल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे. पाकिस्तानात सोशल मिडीयावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, शफाकत अलीला पाकिस्तानात पाय ठेऊ देऊ नका अशीही काहींची भावना आहे.
रविवारी शफाकत अलीने टि्वट करुन माफी मागितली पण त्याच्याकडून चूक झाल्याचा आरोप त्याने फेटाळून लावला. इडन गार्डनवरील खराब म्युझिक सिस्टीममुऴे हे सर्व घडले असे शफाकतने म्हटले आहे. शनिवारी भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी इडन गार्डनवर दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताचे गायन झाले. भारताकडून अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत म्हटले तर, पाकिस्तानकडून शफाकत अमानत अलीने राष्ट्रगीत म्हटले.
शनिवारी खराब हवामानामुळे मला इडनवरील म्युझिक सिस्टीम चेक करता आली नाही. त्यामुळे मी थेट प्रेक्षकांसमोर लाईव्ह राष्ट्रगीत गाण्याचा धोका पत्करला. पण मी कुठेही राष्ट्रगीत चुकीचे म्हटले नाही. म्युझिक सिस्टीममधील तांत्रिक दोषांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असे शफाकत अमानत अली यांनी सांगितले.
Here is my apology... pic.twitter.com/09aGpMqhRs
— Shafqat Amanat Ali (@ShafqatAmanatA) March 20, 2016