'भारत माता की जय' घोषणा देऊ नका - दारुल उलूम

By admin | Published: April 1, 2016 02:54 PM2016-04-01T14:54:28+5:302016-04-01T14:54:28+5:30

मुस्लिमांची प्रमुख धार्मिक संस्था दारुल उलूमने 'भारत माता की जय' ही घोषणा देण्या विरोधात फतवा काढला आहे.

Do not declare 'Bharat Mata Ki Jai' - Darul Uloom | 'भारत माता की जय' घोषणा देऊ नका - दारुल उलूम

'भारत माता की जय' घोषणा देऊ नका - दारुल उलूम

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १- मुस्लिमांची प्रमुख धार्मिक संस्था दारुल उलूमने 'भारत माता की जय' ही घोषणा देण्या विरोधात फतवा काढला आहे. 'भारत माता की जय' ही घोषणा इस्लाम विरोधी आहे असा फतवा दारुल उलूमने काढला आहे. 
 
आमचे देशावर प्रेम आहे. पण आम्ही पूजा करत नाही. इस्लाममध्ये फक्त एका देवाच्या पूजेला परवानगी आहे असे फतव्यामध्ये म्हटले आहे. इस्लाम धर्मामध्ये देश किंवा व्यक्तीला देव मानता येत नाही. उगाचच यावरुन वाद वाढवू नये. आमचे देशावर प्रेम आहे पण आम्ही पूजा करत नाही. घोषणेवरुन मुस्लिमांच्या देशभक्तीचे मोजमाप करु नका असे देवबंदच्या धार्मिक नेत्यांनी म्हटले आहे
 
दारुल उलूमने यापूर्वीही स्वातंत्र्यदिनी मुस्लिमांनी आपल्या घरावर आणि कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवावेत असे फर्मान काढले होते. हा दिवस सर्व मुस्लिमांनी साजरा करावा असे आवाहन दारुल उलूमने केले होते. 
 

Web Title: Do not declare 'Bharat Mata Ki Jai' - Darul Uloom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.