पनामाची गोपनीय कागदपत्रे लीक, अमिताभ, ऐश्वर्यासह जगातील महत्वपूर्ण नेते अडचणीत?

By admin | Published: April 4, 2016 09:42 AM2016-04-04T09:42:57+5:302016-04-04T11:02:54+5:30

पनामा कंपनीची गोपनीय कागदपत्रे लीक झाली असून त्यात जगभरातील नेते, व्यावसायिक आणि सेलिब्रेटींचा समावेश असून अमिताभ बच्चन व ऐश्वर्या राय बच्चनच्या नावाचाही समावेश आहे.

Panama's Confidential Documents Leak, Amitabh, Aishwarya, World's Leading Negative Turner? | पनामाची गोपनीय कागदपत्रे लीक, अमिताभ, ऐश्वर्यासह जगातील महत्वपूर्ण नेते अडचणीत?

पनामाची गोपनीय कागदपत्रे लीक, अमिताभ, ऐश्वर्यासह जगातील महत्वपूर्ण नेते अडचणीत?

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ४ - श्रीमंत व धनाढ्य नागरिक स्वत:ची संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे टॅक्स चोरतात? काय क्लुप्त्या लढवतात, यासंबंधीची माहिती अत्यंत गोपनीयतेने काम करणा-या पनामाच्या मोसेक फोन्सेका कंपनीची महत्वपूर्ण वगोपनीय कागदपत्रे लीक झाल्याने समोर आली आहे. या यादीत जगभरातील अनेक महत्वपूर्ण , धनाढ्य व्यक्ती,उद्योगपती,  सेलिब्रिटी, राजकारण्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत ५०० भारतीयांचीही नावे असून त्यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, सून ऐश्वर्या राय-बच्चन, उद्योजक गौतम अदानी, के.पी.सिंग यांच्यासह काही राजकारणीही आहेत. 'इंडियन एक्स्प्रेस' यासंबंधीचे वृत्त दिले असून पश्चिम बंगालचे शिशीर बजोरिया आणि लोकसत्ता पक्षाचे अनुराग केजरीवाल यांची नावेही यादीत आहेत. 
 
या वृत्तानुसार 'या कागदपत्रांमुळे श्रीमंत आणि ताकदवान लोक आपली संपत्ती लपवण्यासाठी कशा प्रकारे टॅक्सची चोरी करतात ? तसंच कमी टॅक्स भरावा लागावा यासाठी कशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवतात ?' यासंबंधी माहिती समोर आली आहे. मोसेक फोन्सेका आपल्या ग्राहकांना काळा पैसा सफेद करण्यासाठी तसंच नियमांमधून वाचवण्यासाठी आणि करातून सूट मिळावी यासाठी कशा प्रकारे मदत करायची ही माहिती या कागदपत्रांमधून समोर आली आहे. 
 
कागदपत्रामधून मिळालेल्या माहितीप्रमाणे या यादीत एकूण 500 भारतीय नावांचा समावेश आहे ज्यांची नावांची अनेक कंपन्या, संस्था आणि ट्रस्टमध्ये नोंद आहेत. इंडियन एक्स्प्रेसने 8 महिने केलेल्या या तपासात तब्ब्ल 36 हजार फाईल्सची चाचपणी केली गेली आहे. 
 
म्युनिचमधील वृत्तपत्राने ही कागदपत्रे वर्षभरापूर्वी मिळवली होती. त्यानंतर त्यांनी या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम (ICIJ) सोबत हातमिळवणी केली. 100 हून अधिक माध्यम संस्थांनी या कागदपत्रांची तपासणी केली. जुलै 2015 साली इंडियन एक्स्प्रेसने आयसीआयजेसोबत पनामा कागदपत्रांसाठी भारतीय पार्टनर म्हणून करार केला होता. 76 देशातील तब्बल 375 पत्रकारांनी या कागदपत्रांची चाचपणी केली. आयसीआयजेचे अध्यक्ष गेरार्ड राइल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या कागदपत्रांमध्ये मोसाक फोन्सेकाच्या प्रत्येक दिवसाच्या कारभाराची नोंद आहे. कागदपत्रांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की हा संपूर्ण जगासाठी धक्का देणारा मोठा खुलासा असेल.
 
ही कागदपत्रे लीक झाल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, सीरियामधील राष्ट्राध्यक्ष बशर अल असद, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांनीदेखील संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे पनामाची मदत घेतली ही माहिती समोर आली आहे. एकीकडे जगभरातील इतकी मोठे नावे समोर आली असताना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचं नावदेखील समोर आलं आहे. ब्लादिमीर पुतिन यांनी जवळच्या मित्रांची मदत करण्यासाठी पनामाचा वापर केल्याची माहिती उघड झाली आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनोल मेस्सीचादेखील यामध्ये समावेश आहे.
 
अमिताभ बच्चन चार कंपन्यांचे संचालक - 
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अमिताभ बच्चन यांना चार कंपन्यांच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली होती. यामधील तीन कंपन्या बहामाज येथे होत्या. या कंपन्यांचं भांडवल 5 हजार ते 50 हजार डॉलरपर्यंत होतं. मात्र या कंपन्या ज्या जहाजांचा व्यवसाय करत होती त्यांची किंमत कोटींमध्ये होती. 
 
ऐश्वर्या राय बच्चनचंही नाव - 
एकीकडे या यादीत अमिताभ बच्चन यांचे नाव असतानाच त्यांची स्नुषा ऐश्वर्या राय-बच्चन हिच्यासहित तिचे वडील, भाऊ व आईचे नाव अॅमिक पार्टनर लिमिटे़च्या संचालकपदी देण्यात आलं होतं. मात्र 2008 मध्ये हीकंपनी बंद करण्याअगोदर ऐश्वर्याचे नाव संचालकांमधून काढून शेअरहोल्डरमध्ये टाकण्यात आले. 
 

Web Title: Panama's Confidential Documents Leak, Amitabh, Aishwarya, World's Leading Negative Turner?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.