पाकिस्तानची कोलांटीउडी, पठाणकोट हल्ल्याचा कट भारतानेच रचल्याचा आरोप

By admin | Published: April 5, 2016 08:29 AM2016-04-05T08:29:26+5:302016-04-05T08:29:26+5:30

भारतीय अधिका-यांकडे पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे काहीच पुरावे नसल्या कारणाने पाकिस्तानविरोधात लबाडीने प्रचार करण्यात येत असल्याचा आरोप या अधिका-याने केला आहे

The allegations of Pakistan's Cholantyudi, Pathankot attack are being organized by India | पाकिस्तानची कोलांटीउडी, पठाणकोट हल्ल्याचा कट भारतानेच रचल्याचा आरोप

पाकिस्तानची कोलांटीउडी, पठाणकोट हल्ल्याचा कट भारतानेच रचल्याचा आरोप

Next
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ५ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला दिले असताना तसंच पाकिस्तानचं तपास पथक भारतात येऊन तपास करुन गेले असतानादेखील पाकिस्तान या हल्ल्याचा कट त्यांच्याच देशात दहशतवाद्यांनी रचला असल्याचं मान्य करायला तयार नाही आहे. भारताने दिलेले पुरावे पाकिस्तान तपास पथकाला पुरेसे वाटत नसल्याची माहिती आली होती. आणि आता तर पाकिस्तानने हा हल्ला भारतीय अधिका-यांनीच रचला असल्याचा दावा केला आहे. 
 
पाकिस्तान टुडेने तपास पथकातील अधिका-याने ही माहिती दिल्याचं वृत्त दिलं आहे. 'भारतीय अधिका-यांकडे पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे काहीच पुरावे नसल्या कारणाने पाकिस्तानविरोधात लबाडीने प्रचार करण्यात येत असल्याचा', आरोप या अधिका-याने केला आहे. पाकिस्तानचं तपास पथक आपला हा अहवाल पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडे येत्या काही दिवसांत सोपवणार आहे. 
 
या अहवालात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी तन्जील अहमद यांच्या हत्येचीदेखील माहिती देण्यात आली आहे. 'तपास करणा-या मुस्लिम अधिका-याची हत्या हा या गोष्टीचा पुरावा आहे की भारताला हा मुद्दा दाबायचा आहे', असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. एनआयएने पाकिस्तान तपास पथकाला भारत दौ-यादरम्यान अजिबात सहकार्य केलं नसल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. 
एनआयएने दिलेल्या माहितीच्या अत्यंत उलट माहिती पाकिस्तानी तपास पथक देत आहे. पाकिस्तानी अधिका-यांवर दबाब असल्या कारणाने ते अशा प्रकारचं वक्तव्य करत असल्याचा दावा भारतीय सरकारमधील सुत्रांकडून मिळाली आहे. पाकिस्तान नागरिकांनीच हा हल्ला रचल्याचं अधिका-यांनी सांगितलं तर कदाचित काही लोक नाराज होतील त्यामुळे हा खटाटोप सुरु असल्यांचं सुत्रांनी सांगितलं आहे. 
 
तपास पथकाने पाकिस्तान टुडेला दिलेल्या माहितीप्रमाणे दहशतवादी पाकिस्तानमधून भारतात घुसले हे सिद्ध करण्यास भारतीय अधिकारी अयशस्वी ठरलेत. पाकिस्तानची बदनामी करण्यासाठी जगाचं लक्ष वेधून घ्याव यासाठी भारताने हा ड्रामा केल्याचा आरोप करत पाकिस्तानने कोलांटीउडी घेतली आहे. 
 

Web Title: The allegations of Pakistan's Cholantyudi, Pathankot attack are being organized by India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.