पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने शब्द फिरवत शांतता चर्चा थांबवली
By admin | Published: April 8, 2016 09:57 AM2016-04-08T09:57:57+5:302016-04-08T09:57:57+5:30
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतीय अधिका-यांना पाकिस्तानात येऊन पुरावे गोळा करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही असं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सांगितलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ८ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतीय अधिका-यांना पाकिस्तानात येऊन पुरावे गोळा करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही असं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानचं तपास पथक भारतात येऊन तपास करुन गेले असताना पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी हे वक्तव्य केलं आहे. याअगोदरही पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) कोलांटी उडी मारत पठाणकोट हल्ला म्हणजे पाकला बदनाम करण्यासाठी भारतानेच रचलेले नाटक होते असा आरोप केला होता.
पाकिस्तानी तपास पथकाचा दौरा ही देवाण घेवाण नव्हती असं अब्दुल बसित बोलले आहेत. तसंच भारतासोबत सुरु असलेली शांतता चर्चादेखील रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानने आपला शब्द फिरवल्यामुळे केंद्र सरकार कोंडीत सापडण्याची शक्यता असून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानचं तपास पथक भारतात येईल आणि त्या बदल्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी पाकिस्तानात जाऊन तपास करतील असं ठरल होतं अशी माहिती सरकारने दिली आहे.
पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांची भुमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. परराष्ट्र सचिवांशी यासंदर्भात चर्चा होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. पठाणकोट दहशतवाही हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा सहभाग आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी विशेष पथक नेमलं होतं.
Todays announcements by Pak are a slap on India's face, thanks to our PM
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 7, 2016
Amit shah lauded Pak's efforts and gave it clean chit just a few days back. Every Indian is feeling anguished today https://t.co/eDlxTfuTYr
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 7, 2016