'दारूअभावी' बिहारमध्ये झाला दोघांचा मृत्यू

By admin | Published: April 9, 2016 10:41 AM2016-04-09T10:41:40+5:302016-04-09T10:44:42+5:30

संपूर्ण बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्यात आली असून दारूअभावी दोन जणांचा मृत्यू झाला.

'Do not waste' Bihar dies in both deaths | 'दारूअभावी' बिहारमध्ये झाला दोघांचा मृत्यू

'दारूअभावी' बिहारमध्ये झाला दोघांचा मृत्यू

Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ९ - संपूर्ण बिहारमध्ये एप्रिल महिन्यापासून दारूबंदी लागू करण्यात आली असून अनेक नागरिक दारूअभावी कासावीस झाले आहेत. ही कडक दारूबंदी दोन जणांच्या जीवावर बेतली असून दारू न मिळाल्याने राज्यात दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून त्यात एका पोलिसाचाही समावेश आहे. 
मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी गेल्या वर्षी निवडणुकीदरम्यान केलेल्या घोषणेनुसार, १ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात दारूबंदी लागू करण्यात आली, रोज दारू प्यायची सवय असलेल्या नागरिकांना दारू न मिळाल्यामुळे त्रास झाल्याचे अनके किस्से या आठवड्याभरात समोर आले. अनेकांना चक्कर आली तर काहींच्या शरीराला कंपही सुटला. दारूअभावी एका सहाय्यक पोलिसाचा व आणखी एका व्यक्तीचा तर मृत्यूच झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रघुनंदन बेसरा असे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसाचे नाव असून रोजचा दारूचा कोटा न मिळाल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते, त्यांना उपचारांसाठी पाटणा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल (पीएमसीएच) येथे दाखल करण्यात आले होते. मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाला. तर दारूअभावी मृत्यूमुखी पडलेल्या दुस-या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. 
राज्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू करण्यात आली, त्यानंतर अवघ्या ४-५ दिवसांत लोक दारूअभावी आजारी पडू लागले, विक्षिप्त वर्तन करू लागले, एका व्यक्तीने तर नशा मिळवण्यासाठी चक्क साबणाची वडीच खाल्ली
 

Web Title: 'Do not waste' Bihar dies in both deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.