अरे वा ! ट्विटरची शब्दमर्यादा 10 हजारापर्यंत वाढणार

By admin | Published: May 17, 2016 03:04 PM2016-05-17T15:04:02+5:302016-05-17T15:04:02+5:30

ट्विटरने शब्दमर्यादा वाढवायचं ठरवलं असून सध्या असलेली 140 शब्दांची मर्यादा 10 हजारापर्यत वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे

Oh no! Twitter's terms will grow to 10,000 | अरे वा ! ट्विटरची शब्दमर्यादा 10 हजारापर्यंत वाढणार

अरे वा ! ट्विटरची शब्दमर्यादा 10 हजारापर्यंत वाढणार

Next
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 17 - ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करायची असेल तर त्याला मोजक्या शब्दांची मर्यादा आहे. तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते 140 शब्दांमध्येच बसवाव लागतं. यामुळे काही जणांना आपलं म्हणण नीट मांडता येत नाही, त्यामुळे ही शब्दमर्यादा वाढवावी अशी इच्छा व्यक्त केली जात होती. त्यामुळे ट्विटरनेदेखील शब्दमर्यादा वाढवायचं ठरवलं असून सध्या असलेली 140 शब्दांची मर्यादा 10 हजारापर्यत वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार मे महिन्याच्या अखेपर्यंत हा बदल केला जाऊ शकतो. सध्या ट्विटरकरांना मजकूर, फोटो टाकायचं असेल तर 140 शब्दांच्या मर्यादेपेक्षा जास्त टाकता येत नाही. जानेवारी महिन्यात हा बदल केला जाणार होता असं वृत्त आलं होतं. मात्र काही कारणास्तव हा बदल करण्यातच आला नव्हता. 
 
ट्विटरच्या या निर्णयाचा फायदा त्यांचे शेअर्स वाढण्यामध्ये होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ट्विटर शब्दमर्यादा वाढल्याचा फायदा जाहिरात कंपन्यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. जास्तीत जास्त जाहिराती तसंच क्रिएटिव्हिटि दाखवण्याची संधी त्यांना मिळू शकते. 
ट्विटरचे शेअर्स गडगडले - 
गेल्या वर्षभरात फेसबुकचे शेअर जवळपास ५० टक्क्यांनी तेजीत आहेत तर ट्विटरचे शेअर्स ८० टक्क्यांनी घटले आहेत. फेसबूक कंपनीच्या नफ्यात सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे महसूल ६५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढला. सोशल मीडियात फेसबुकची मोठी क्रेझ आहे. फेसबूकच्या युजर संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. नेटीझन्सचा फेसबुकच्याच इन्स्टाग्रामला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याउलट परिस्थिती ट्विटरची आहे. ट्विटर कंपनीच्या उत्पन्नात वर्षभरात फारशी तेजी आली नाही. गेल्या काही महिन्यांतील नफा फारसा उत्साहजनक नाही. युजर्सची संख्या वाढवण्यात म्हणावे तेवढे यश नाही. यामुळे सोशल मिडियात ट्विटरची डुबकी, फेसबुकची तेजी! बघायला मिळत आहे. 
 

Web Title: Oh no! Twitter's terms will grow to 10,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.