राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर, भाजपसाठी 'अच्छे दिन' - स्मृती इराणी
By admin | Published: June 2, 2016 08:34 AM2016-06-02T08:34:32+5:302016-06-02T08:38:43+5:30
राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर, भाजपचे 'अच्छे दिन' सुरु झाले समजा असे वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर, भाजपचे 'अच्छे दिन' सुरु झाले समजा असे वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे. लवकरच राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होईल अशी चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी अध्यक्ष झाले तर, भाजपला आणखी चांगले दिवस येतील असे इराणी यांनी म्हटले आहे.
टाईम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दोन वर्षातील त्यांच्या कार्यकाळात शैक्षणिक व्यवस्था सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेल्या उपायोजना शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे आव्हान होते. मागच्या दोन वर्षात शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे त्यांनी सांगितले.
हैदराबाद विद्यापीठाचा दाखला देत इराणींना तुम्ही आणि तुमचे मंत्रालय विविध वादात अडकले असा प्रश्न विचारला. त्यावर त्या म्हणाल्या की, सरकार प्रत्येक विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करत नाही. हैदराबाद विद्यापीठासंबंधी मी जे संसेदत बोलले. प्रत्येक वाक्याचा मी कागदपत्राव्दारे दाखला दिला असे त्यांनी सांगितले.
२०१९ मध्ये तुम्हाला शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल दिसून येईल जो तुम्ही मागच्या ३०-४० वर्षात पाहिलेला नाही असा दावा इराणींनी केला.