प्रवाहासोबत वाहत जाण्यासाठी नव्हे; दिशा देण्यासाठी राजकारणात - अमित शहा

By admin | Published: June 12, 2016 11:03 AM2016-06-12T11:03:54+5:302016-06-12T11:25:58+5:30

प्रवाहासोबत वाहत जाण्यासाठी नव्हे; तर प्रवाहाला दिशा देण्यासाठी आपण राजकारणात आहोत असे मत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत मार्गदर्शन करताना मांडले.

Not for air to flow; Politics for direction - Amit Shah | प्रवाहासोबत वाहत जाण्यासाठी नव्हे; दिशा देण्यासाठी राजकारणात - अमित शहा

प्रवाहासोबत वाहत जाण्यासाठी नव्हे; दिशा देण्यासाठी राजकारणात - अमित शहा

Next

ऑनलाइन लोकमत

अलाहाबाद, दि. १२ : प्रवाहासोबत वाहत जाण्यासाठी नव्हे; तर प्रवाहाला दिशा देण्यासाठी आपण राजकारणात आहोत असे मत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत मार्गदर्शन करताना मांडले. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक सुरू झाली आहे. त्यामध्ये मार्गदर्शन करताना शहा बोलत होते. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत २७ तास मंथन होणार आहे.
 
त्या अनुषंगाने शहरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्य सहभागी झाले आहेत. दोन दिवसाच्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आज कुठलाही प्रस्ताव मंजूर होणार नसल्याची माहीती सुत्राकडून मिळाली आहे. 
 
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला विशेष संरक्षण समूह (एसपीजी) गुरुवारीच शहरात डेरेदाखल झाला असून, त्याने कायस्थ शाळेच्या पटांगणाची सुरक्षा व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली आहे. याच ठिकाणी उभारलेल्या विशाल आणि वातानुकूलित शामियानात ही बैठक सुरु झाली आहे.
या निमित्त पवित्र संगमाजवळ परेड ग्राउंडलगत सोमवारी जाहीर सभाही आयोजित करण्यात आली आहे. एसपीजीकडून स्थानिक सर्किट हाउसच्या सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेण्यात येत आहे. १२ आणि १३ जूनच्या रात्री मोदींचा मुक्काम सर्किट हाउसवर असणार आहे.
 
भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीला केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि खासदार सहभागी होणार असून राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे डावपेच यावेळी ठरविले जाऊ शकतात. शहरात गुरुवारपासूनच डेरेदाखल झालेले भाजपाचे राष्ट्रीय सचिव सिद्धार्थनाथ सिंग यांनी सांगितले की, अलाहाबाद हे राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू झाला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू ते व्ही. पी. सिंगसारख्या दिग्गज नेत्यांनी याच शहरातून राजकारणाचे धडे घेतले. त्यामुळे येथे पक्षाची बैठक आयोजित करण्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणात बदल आणण्याचा आमच्या प्रयत्नांना निश्चित बळ मिळेल.
 

Web Title: Not for air to flow; Politics for direction - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.