गुलबर्गा जळीतकांड प्रकरण - 11 दोषींना जन्मठेप तर 10 जणांना 7 वर्ष कारावासाची शिक्षा

By admin | Published: June 17, 2016 11:50 AM2016-06-17T11:50:46+5:302016-06-17T16:24:05+5:30

संपुर्ण देशाला हादरवणा-या गुलबर्गा सोसायटी जळीतकांड प्रकरणी न्यायालयाने 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

Gulbarga case: 11 imprisonment for life imprisonment and 10 for seven years imprisonment for imprisonment | गुलबर्गा जळीतकांड प्रकरण - 11 दोषींना जन्मठेप तर 10 जणांना 7 वर्ष कारावासाची शिक्षा

गुलबर्गा जळीतकांड प्रकरण - 11 दोषींना जन्मठेप तर 10 जणांना 7 वर्ष कारावासाची शिक्षा

Next
style="text-align: justify;"> 
ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 17 - संपुर्ण देशाला हादरवणा-या गुलबर्गा सोसायटी जळीतकांड प्रकरणी न्यायालयाने 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 10 दोषींना 7 वर्ष आणि एकाला 10 वर्ष कारावसाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या जळीतकांड प्रकरणी विशेष कोर्टाने 2 जून रोजी 24 आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर 36 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे.
 
गुजरात दंगलीनंतर 2002 मध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचं वास्तव्य असलेल्या गुलबर्ग सोसायटीला आग लावण्यात आली होती. त्यात एहसान जाफरींसह 69 जण मृत्यूमुखी पडले होते. 
 
याला न्याय म्हणता येणार नाही - झाकीया जाफरी 
 
विशेष कोर्टाचे न्यायाधीश पीबी देसाई यांनी 11 जणांना हत्या आणि इतर गुन्हे, तर विहिंप नेते अतुल वैद्यसह 13 जणांना कमी गंभीर गुन्ह्यात दोषी ठरवलं होतं.मागच्या आठवडयात अहमदाबाद न्यायालयाने ६६ पैकी २४ आरोपींना दोषी ठरवले होते. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने ३६ आरोपींची निर्दोष सुटका केली होती. सुनावणी सुरु असताना पाच आरोपींचा मृत्यू झाला. एक आरोपी बेपत्ता आहे. १४ वर्षानंतर या प्रकरणात निकाल आला आहे. 
 
गुजरातेत २००२ मध्ये उसळलेल्या जातीय दंगलीच्यावेळी हिंसक जमावाने अहमदाबादमधील गुलबर्ग सोसाटीवर हल्ला केला होता. यात ६९ जण ठार झाले होते. यात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचा समावेश आहे. 
 
सुटका झालेल्यांमध्ये चारवेळा भाजपचा नगरसेवक राहिलेल्या बिपीन पटेलचा समावेश आहे. हिंसाचार करणा-या जमावामध्ये सहभागी असल्याचा पटेलवर आरोप होता. ६६ आरोपींविरोधातील गुन्हेगारी कटाचा आरोप न्यायालयाने फेटाळून लावला होता. हा गुन्हेगारी कट असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. गोध्रा रेल्वे स्थानकावर जमावाने साबरमती एक्सप्रेसच्या डब्ब्यांना आग लावल्यानंतर दुस-या दिवशी २८ फेब्रुवारी २००३ रोजी जमावाने गुलबर्ग सोसायटीला लक्ष्य केले होते. 
 
हिंसक जमावाने यावेळी गुलबर्ग सोसायटीमधील घरे पेटवून दिली. काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांना खेचून घराबाहेर आणले व जाळून मारले. मदतीसाठी त्यावेळी जाफरी यांनी पोलिस अधिकारी आणि राजकारण्यांना फोन केले होते पण त्याला समोरुन त्याला कोणतेही उत्तर मिळाले नाही. 
 
हत्येसाठी फक्त ११ जणांना दोषी ठरवण्याच्या न्यायालयाच्या निकालावर आपण समाधानी नसल्याचे एहसान जाफरी यांची पत्नी झाकिया यांनी सांगितले. त्यांनी काय केले ते मला माहित आहे त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असे झाकीया म्हणाल्या. 
 
गुलबर्ग सोसायटी हत्याकांड २००२ गुजरात दंगलीतील १० मोठया घटनांपैकी एक आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकामार्फत पुन्हा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली. 
 
 
 
 

Web Title: Gulbarga case: 11 imprisonment for life imprisonment and 10 for seven years imprisonment for imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.