'हिजबुल'च्या कमांडरसह ३ अतिरेक्यांचा खात्मा

By admin | Published: July 8, 2016 10:29 PM2016-07-08T22:29:56+5:302016-07-08T22:29:56+5:30

हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बुरहान वानी याला कंठस्नान घालण्यात अखेर यश आले. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी आणि पोलिसाच झालेल्या

The execution of 3 terrorists including commander of Hizbul | 'हिजबुल'च्या कमांडरसह ३ अतिरेक्यांचा खात्मा

'हिजबुल'च्या कमांडरसह ३ अतिरेक्यांचा खात्मा

Next
ऑनलाइन लोकमत
अनंतनाग, दि. ८ : हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बुरहान वानी याला कंठस्नान घालण्यात अखेर यश आले. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी आणि पोलिसाच झालेल्या चकमकीत बुरहानला लष्काराने यमसदनी पाठवले आहे. दीर्घ काळ चाललेल्या या चकमकीत बुरहानसोबत तिघा दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले आहे.
 
स्वतःचा आणि आपल्या साथीदारांचा फोटो सोशल मीडियावर टाकणारा बुरहान हा पहिला (कमांडर) दहशतवादी होता. बुरहानसोबत ज्या दहशतवाद्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यांचा वेगवेगळ्या चकमकीत मृत्यू झाला आहे. बुरहानचा खात्मा हा सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने मोठं यश मानलं जात आहे. 
 

Web Title: The execution of 3 terrorists including commander of Hizbul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.