'ट्विटर' चा आणखी एक धमाका
By admin | Published: July 12, 2016 09:24 PM2016-07-12T21:24:29+5:302016-07-12T21:24:29+5:30
बिझ स्टोन, ईव्हान विलियम्स आणि जैक डॉर्सी या तिघांनी मिळून अमेरिकेच्या ऑस्टिन शहरात 'ट्विटर' ही कंपनी सुरू केली.
-अनिल भापकर,
बिझ स्टोन, ईव्हान विलियम्स आणि जैक डॉर्सी या तिघांनी मिळून अमेरिकेच्या ऑस्टिन शहरात 'ट्विटर' ही कंपनी सुरू केली. 'जस्ट सेंटिग अप माय ट्विटर' असे पहिले ट्विट जॅक डॉर्सीने २१ मार्च २००६ ला केले आणि ट्विटरचा उदय झाला. आजच्या घडीला ट्विटरवर दिवसभरात 50 कोटीहून अधिक ट्विट केले जातात तर वर्षभरात सुमारे २० अब्ज ट्विट्स केली जातात. प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट्सपैकी एक असणा-या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या 'ट्विटर' ने आज आणखी एक मोठा धमाका करून आपल्या युझर्स ला सुखद धक्का दिला आहे. 'ट्विटर' ने आता जीआयएफ इमेज साठी साईज लिमिट पाच एमबी वरून पंधरा एमबी केली आहे .
'ट्विटर' ने प्रथम २०१४ मध्ये ऍनिमेटेड जीआयएफ इमेज सपोर्ट सुरू करून सोशल मेडिया मध्ये धमाल उडवून दिली . आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ऍनिमेशन हे एक चांगले माध्यम असून त्याचा वापर युझर्स करतील हे ओळखून 'ट्विटर' ने ऍनिमेटेड जीआयएफ इमेज सपोर्ट सुरू केला होता . मात्र त्यासाठी साईज लिमिट फक्त पाच एमबी एवढी होती . ऍनिमेटेड जीआयएफ इमेज ची लोकप्रियता बघून 'ट्विटर' ने ऍनिमेटेड जीआयएफ इमेज साठी साईज लिमिट पंधरा एमबी एवढी वाढवली आहे मात्र त्यासाठी तुम्हाला 'ट्विटर'चे डेस्कटॉप व्हर्जन वापरावे लागणार आहे. कारण अजून ऍप व्हर्जन साठी ऍनिमेटेड जीआयएफ इमेज साईज अजूनही पाच एमबीच आहे.