झाकीर नाईकच्या व्हिडीओजची तपासणी

By admin | Published: July 13, 2016 03:53 AM2016-07-13T03:53:06+5:302016-07-13T03:53:06+5:30

डॉ. झाकीर नाईकचे फेसबुक, टिष्ट्वटर आणि युट्युबवरील फॉलोअर्स तसेच त्यांचे टीकाकार पोलिसांच्या रडारवर आहेत. तपास पथकाने सोशल साईट्सवरील नाईकच्या २०० पेक्षा जास्त व्हिडिओची पडताळणी केली आहे.

Zakir Naik's video checks | झाकीर नाईकच्या व्हिडीओजची तपासणी

झाकीर नाईकच्या व्हिडीओजची तपासणी

Next

मुंबई : डॉ. झाकीर नाईकचे फेसबुक, टिष्ट्वटर आणि युट्युबवरील फॉलोअर्स तसेच त्यांचे टीकाकार पोलिसांच्या रडारवर आहेत. तपास पथकाने सोशल साईट्सवरील नाईकच्या २०० पेक्षा जास्त व्हिडिओची पडताळणी केली आहे.
मुंबई पोलिसांकडून नाईक याच्या भाषणांची कसून चौकशी सुरू आहे. यामध्ये विशेष शाखा, एटीएस, गुन्हे शाखा, सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांसहीत तपास यंत्रणा काम करत आहेत. विशेष शाखेच्या चौकशी पथकाने नाईकच्या पीस चॅनेलमधील कार्यालयातून काही डीव्हीडी, सीडीज जप्त केल्या आहेत. त्यामध्ये २००० साली केलेल्या भाषणांचा समावेश आहे. नाईक याने आपल्या भाषणादरम्यान हिंदू आणि इतर धर्मा$ंच्या देवतांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे की नाही, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यासाठी झाकीरच्या भाषणाचे ट्रान्सक्रिप्ट तयार करण्यात आले आहे.
याशिवाय, झाकीर नाईक याची इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन देखील पोलिसांच्या रडारवर आहे. झाकीर नाईक ज्या पीस टीव्हीवर भाषण करतो, त्याचे प्रसारण करणाऱ्या केबल टीव्ही आॅपरेटर्सवर कारवाई करण्यात आली आहे. या आक्षेपार्ह भाषणांसंदर्भात आयबीने गृह मंत्रालयाला दीड वर्षांपूर्वीच माहिती दिली होती. (प्रतिनिधी)


१४ जुलै रोजी नाईक हे कुलाबा कफपरेड येथील वर्ल्ड टे्रड सेंटरमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार आहे. त्यामुळे तेथे गर्दी जमण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र यावेळी नाईक आपली बाजू कशी मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांचे मौन : नाईक यांच्या डोंगरी येथील इस्लामिक रिसर्च फाऊण्डेशन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मौन बाळगले आहे. कार्यालयातील कामकाज सुरू आहेत.

2007 मधील ग्लासगो हल्यातील आरोपी सबील अहमद हा झाकीर नाईक याच्या भाषणांमुळे प्रेरित झाला होता, असे उघड झाले होते. दीड वर्षानंतरही गृह मंत्रालयानं नाईकवर कुठलीही कारवाई केली नाही. राज्यात नाईक विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. २०१३ मध्ये नाईकने गणेशोत्सवावेळी आक्षेपार्ह भाषण केल्याने सर्वत्र टीकेची झोड उठली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात कुर्ला, वेंगुर्ला व सावंतवाडीत गुन्हे दाखल झाले होते. त्यांना चौकशीसाठी बोलावले होते अशी माहितीही पोलिस चौकशीत समोर येत आहे.

Web Title: Zakir Naik's video checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.