पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या घरावर बुल्डोझर
By admin | Published: August 11, 2016 12:24 PM2016-08-11T12:24:11+5:302016-08-11T12:24:52+5:30
साचलेलं पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा करणा-या हजारो घरांवर कारवाई करण्यात येणार आहे ज्यामधील एक घर पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेले जवान लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांचं आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
बंगळुरु, दि. 11 - साचलेलं पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा करणा-या हजारो घरांवर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या घरांमधील एक घर पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेले जवान लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांचं आहे. जानेवारीमध्ये पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले होते. पुढील 4 महिन्यांमध्ये 1,100 घरांवर कारवाई करण्यात येणार आहे ज्यामध्ये निरंजन कुमार यांचंदेखील घर आहे. शहीद जवानाच्या घरावर अशाप्रकारे कारवाई करण्यात येत असल्याने कुटुंबाने रोष व्यक्त केला आहे.
देशासाठी आपले प्राण गमावणा-या जवानाची कदर केली गेली पाहिजे असं कुटुंबाचं म्हणणं आहे. 'हे पचवणं आमच्यासाठी खूप कठीण आहे, कारण आम्ही दहशतवादी हल्ल्यात आमचा भाऊ गमावला आहे. ही कारवाई थांबवावी अशी मी विनंती करतो. निरंजनने देशासाठी जीव गमावला आहे, असं झाल्यास ही लाजेची गोष्ट असेल', असं निरंजन यांचे बंधू शशांक यांनी सांगितलं आहे.
It's not a common man's house,It's a national hero's house. They need to consult us first: Lt.Col Niranjan's Brother pic.twitter.com/WjFcRbm3Vq
— ANI (@ANI_news) August 11, 2016
मात्र ही कारवाई गरजेची असल्याचं अधिका-यांचं म्हणणं आहे. शहराला पुरापासून धोका आहे, आणि पाणी वाहून नेण्यासाठी ही घरं पाडणं गरजेचं आहे. गेल्या महिन्यात पाण्यातून साप, मासे रस्त्यावर आले होते असं अधिकारी सांगत आहेत.
Govt can give alternative site to them to build another house: G Parmeshwara,Karnataka HM on Lt.Col Niranjan's house pic.twitter.com/Eo3vhIiwQa
— ANI (@ANI_news) August 11, 2016
'आम्हाला सहानुभूती आहे, मात्र लोकांच्या भल्यासाठी हे करणं गरजेचं आहे', असं नागरी आयुक्त मंजुनाथ प्रसाद यांनी सांगितलं आहे. निरंजन कुमार यांचं कुटुंब केरळचे असून गेल्या अनेक वर्षापासून ते बंगळुरुत राहत आहेत.
अशा प्रकारे शहीद जवानाच्या घरावर कारवाई करणे योग्य आहे का ? की त्यांना विशेष सवलत द्यावी ? तुमची प्रतिक्रिया कळवा