केरळमध्ये धोकादायक भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याचे आदेश
By admin | Published: August 23, 2016 04:29 PM2016-08-23T16:29:14+5:302016-08-23T16:29:14+5:30
केरळ सरकारने धोकादायक ठरू शकणा-या भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांवर मोकाट फिरणा-या धोकादायक कुत्र्यांना ठार मारण्याचा निर्णय घेतला
Next
ऑनलाइन लोकमत
थिरुअनंतपुरम, दि. 23 - केरळ सरकारने धोकादायक ठरू शकणा-या भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्त्यांवर मोकाट फिरणा-या धोकादायक कुत्र्यांना ठार मारण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविण्यात येणार असल्याचे येथील स्थानिक नेते के.टी. जलील यांनी सांगितले. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोणताही संकोच न बाळगता या आदेशाची अंमलबजावणी करावी, असेही के.टी. जलील यावेळी म्हणाले.
गेल्या तीन दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने येथील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.