गुजरातमध्ये दहशतवादी घुसल्याची शक्यता, हाय अलर्ट जारी

By admin | Published: October 6, 2016 01:17 PM2016-10-06T13:17:00+5:302016-10-06T13:22:53+5:30

गुजरातमध्ये दहशतवादी घुसल्याची शक्यता असून त्या पार्श्वभुमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे

Terror suspects in Gujarat, high alert issue | गुजरातमध्ये दहशतवादी घुसल्याची शक्यता, हाय अलर्ट जारी

गुजरातमध्ये दहशतवादी घुसल्याची शक्यता, हाय अलर्ट जारी

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - गुजरातमध्ये दहशतवादी घुसल्याची शक्यता असून त्या पार्श्वभुमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. इसीसच्या दहशतवाद्यांनी गुजरातमध्ये घुसखोरी केली असल्याची शक्यता आहे. सर्व मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. द्वारका मंदिरावर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
 
(गुजरातमध्ये आढळली पाकिस्तानी बोट, बोटीतील नऊ जण ताब्यात)
 
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12 ते 15 संशयित दहशतवादी समुद्रामार्गे गुजरातमध्ये घुसले आहेत. आयएसआयने या दहशतवाद्यांना पाठवले असल्याची शंका आहे. भारतान केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानकडून हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. अलीकडेच गुजरातच्या समुद्रामध्ये संशयास्पद बोटदेखील सापडली होती.
 

Web Title: Terror suspects in Gujarat, high alert issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.